Nashik News : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सोमवारी (ता. ४) सकाळी अकराला नांदगाव सदो (ता. इगतपुरी) येथे होणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. (nashik Bharvir to Igatpuri phase inaugurated today by Guardian Minister Dada Bhuse marathi news)
समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरीदरम्यानचा हा तिसरा टप्पा आहे. जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील २४.८७२ किलोमीटर लांबी एकूण १६ गावांतून जात असून, पॅकेज १३ अंतर्गत २३.२५१ किलोमीटर व पॅकेज १४ अंतर्गत १.६२१ किलोमीटर लांबीचा समावेश आहे. (latest marathi news)
प्रकल्पाच्या या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये एक हजार ७८ कोटी असून, या टप्प्याच्या लोकार्पणामुळे ७०१ किलोमीटरपैकी आता एकूण ६२५ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतिपथावर आहे.
इगतपुरीत इंटरचेंजचा वापर करून ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल. एक तासात शिर्डीला पोहोचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.