विकास गिते : सकाळ वृत्तसेवा
Nashik Dam Overflow : ठाणगाव परिसरातील जीवनवाहिनी असलेले उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. संततधारेमुळे म्हाळुंगी नदी जोरदार प्रवाहित झाल्याने अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. त्यानंतर उंबरदरी धरण परिसरातही सतत पडणाऱ्या पावसामुळे रविवारी धरण ओव्हरफ्लो झाले. धरणावर जीवन प्राधिकरणाची ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, तूर्त योजनेचा पाणीप्रश्न मिटला आहे. (Bhojapur and Umbardi dam overflow )
सलग काही दिवसांपासून जिल्ह्याभरात पावसाने मुक्काम ठोकल्याने तालुक्यातील अनेक धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण रविवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे शेती सिंचनाबरोबरच परिसरातील २५ ते ३० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. (latest marathi news)
भोजापूरमुळे भागणार ३९ गावांची तहान
भोजापूर धरणावर सिन्नर तालुक्यातील मनेगावसह १६ गावे, कणकोरीसह पाच गावे आणि संगमनेर तालुक्यातील निमोणसह नावे, अशा तीन पाणी योजना आहेत. दोन्ही तालुक्यांतील मिळून सुमारे ३१ गावांना धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे धरणात जिवंत पाणीसाठा होणे गरजेचे आहे. धरणातून पूरपाणी परिसरात आणि रब्बीसाठी आवर्तन सोडले जाते.
म्हाळुंगी नदीचा उगम ठाणगावच्या पाचपट्टा किल्ला परिसरातून होतो. या भागात काही दिवसांपासून पाऊस होत असल्याने म्हाळुंगी नदी दुधडी भरून वाहू लागली आहे. उंबरदरी धरण भरल्याने भोजापूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सिन्नर तालुक्यातील कोनांबे, बोरखिंड व उंबरदरी धरण 100 टक्के भरले असून, भोजापूर 100 टक्के भरले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.