नाशिक रोड : जय भवानी रोडवरील तीस गुंठे भूखंडावर उभारलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात ११ ते १५ एप्रिलच्या दरम्यान होणाऱ्या तुळजाभवानी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी यज्ञमंडपाचे भूमिपूजन झाले. चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी नवकुंडात्मक यज्ञ उभारण्यात येणार आहे. (Nashik Bhoomipujan of Tulja Bhavani Mata Murti Pran Pratishtha marathi news)
भूमिपूजन श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी सहाणे, वैशाली सहाणे या दांपत्याने ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषातील विधिवत केले. श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठमचे दत्तयोगी अण्णा गुरुजी महाराज यांनी कुदळ मारून उद्घाटन केले. येथे योनी कुंड, अर्धचंद्रकार कुंड, त्रिकोणी कुंड, गोल कुंड, षडाष्टकर कुंड, पद्म कुंड, षडाक्षर कुंड व त्रिकोणी अशा नऊ कुंडांच्या निर्मितीचे काम सुरू केले आहे.
चार दिवस ही यज्ञपूजा चालणार असल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली. या यज्ञमंडपातच तुळजाभवानी माता, भगवान शंकर, भैरवनाथ, हनुमान व भगवान गणेश आदींच्या मूर्ती पूजेसाठी ठेवणार आहेत. कुंडांवरील यज्ञ कुटीही पौराणिक काळातील यज्ञांप्रमाणे उभारणार आहे. या मूर्तीची शोभायात्रा ९ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ७ या वेळात परिसरातून काढणार आहे. भूमिपूजनप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे, दत्ता गायकवाड, हेमंत गायकवाड,
सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, जिजाबाई गायकवाड, जयश्री गायकवाड, लता रुंजाजी पाटोळे, ज्योती खोले, योगिता गायकवाड, कांता वराडे, खंडूभाऊ दातीर, अतुल धोंगडे, शंकर देवाणी, बाळनाथ सरोदे, बाळासाहेब मते, विक्रम कोठुळे, शिवाजी हांडोरे, नितीन चिडे, विकास भागवत, विजय जाधव, डॉ. प्रमोद पाटील, सूर्यभान घाडगे, नंदू हांडे, श्यामराव खोले, पोपटराव जाचक, दत्तू जाचक, सुधाकर जाधव, मुकुंद आढाव, शंकर औशिकर, गणेश कदम, टिंकू खोले, कैलास चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, विक्रम कदम, पोपट चव्हाण, संपत लवटे, दीपक लवटे, वामनराव कदम, गणपत गायकवाड, निवृत्ती चव्हाण, पोपट चव्हाण, बाबूराव पाटोळे, सुरेश सहाणे, पोपट थोरात, नेताजी गायकवाड, रवी लोणकर, दिनकर डावखर, ज्ञानेश्वर डावखर, प्रमोद चव्हाण, नंदू लवटे, सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते. (latest marathi news)
विश्वस्त कार्याध्यक्ष किशोर जाचक, उपाध्यक्ष रमेश थोरात, सचिव सुभाष पाटोळे, खजिनदार राजेंद्र गायकवाड, सहखजिनदार रवींद्र गायकवाड, सहसचिव कैलास कदम, विश्वस्त रुंजाजी पाटोळे, दिनेश खांडरे, कदम, प्रमोद लोणकर, शिवाजी लवटे, पोपट पाटोळे, बाळासाहेब गायकवाड, दिलीप कदम, बाळासाहेब चव्हाण, किरण सहाणे, अनिल शिरसाठ, अरुण गायकवाड, पोपट चव्हाण, माया भागवत, चिमणराव देशमुख आदी गत चौदा वर्षांपासून हे मंदिर उभारण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत.
आर्कि. राजेश सोमपुरा यांनी मंदिराची उभारणी वास्तुकलेचा एक आदर्श नमुना अशा पद्धतीने कलाकौशल्याने केली आहे. भालेराव मंडळींच्या या जागेत मातेचे छोटेसे मंदिर होते. ही जागा मळेकऱ्यांनी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टसाठी विकत घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.