Children who participated in the Bal Pathamchanal of Balshakhas organized by Rashtriya Swayamsevak Sangh. esakal
नाशिक

Nashik News : भोसला गटाचे दिमाखदार बाल पथसंचलन; कॉलेज रोडवर रांगोळ्या, फुलांची उधळण करीत स्वागत

Nashik News : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भोसला गटातर्फे रविवारी (ता. ६) कॉलेजरोड परिसरातून बाल पथसंचलन दिमाखात पार पडले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भोसला गटातर्फे रविवारी (ता. ६) कॉलेजरोड परिसरातून बाल पथसंचलन दिमाखात पार पडले. या बाल पथसंचलनाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. पथसंचलनाचे जागोजागी उत्साहात स्वागत करण्यात आले.
विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात सुमारे २२ वेगवेगळ्या ठिकाणी पथसंचलन आयोजित केले जाते. (Bhosala group of Rashtriya Swayamsevak Sangh organized children walk at College Road )

संघाच्या स्थापनेला यंदा ९९ वर्षे पूर्ण होत असून, त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच भोसला गटाचे बाल पथसंचलन झाले. या संचलनात १३१ बाल स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अभय सुखात्मे, शहर संघचालक डॉ. विजय मालपाठक, कार्यवाह सुहास वैद्य, गट कार्यवाह युवराज वाईकर उपस्थित होते. विद्या प्रबोधिनी प्रशालेपासून संचलनास प्रारंभ झाला. (latest marathi news)

मॉडेल कॉलनी चौक, शहीद सर्कल, एस टी कॉलनी, आकाशवाणी, नेरलीकर चौक या मार्गे ते परत भोसला मिलिटरी कॉलेज असे सुमारे दोन किमी अंतराचे हे संचलन झाले. घोषाच्या तालावर झालेल्या बाल स्वयंसेवकांच्या या संचलनाच्या स्वागतासाठी नागरिकांनी जागोजागी रांगोळ्या काढत स्वागत केले. संचलन मार्गावर नागरिकांनी अनेक ठिकाणी ध्वज आणि स्वयंसेवकांवर फुले उधळली. दिमाखात निघालेल्या या बाल पथसंचलनाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT