Success Story : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच पोलिस उपनिरीक्षक २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत ओतूर (ता. कळवण) येथील भूषण राजेंद्र देशमुख याने यश मिळविले आहे. जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्याने यशाला गवसणी घातली आहे. दरम्यान त्याच्या यशाचा आनंद व्यक्त करताना मित्र परिवाराकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. (Bhushan become PSI succeeds in first attempt )
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या भूषणचे प्राथमिक शिक्षण ओतूर या मूळगावी माध्यमिक विद्यालयात झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पिंपळनेर येथील कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील विद्यालयातून विज्ञान शाखेतून पूर्ण केले. यानंतर पुढे बी.एस्सी (कृषी) चे शिक्षण के. के. वाघ कृषी महाविद्यालयातून २०१७ साली पूर्ण केले. (latest marathi news)
आधीपासून वर्दीची आवड आणि पोलिस उपनिरीक्षक हे आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणारे पद असल्यामुळे त्याने आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या मुंबई नाका परीसरातील कमळाबाई गिते अभ्यासिकेत त्याने तयारी सुरु ठेवली होती. भूषणचे आई-वडील दोघेही शेती करतात. अत्यंत अल्प कालावधीत स्वमेहनतीच्या जोरावर शेतकरी कुटुंबातील या होतकरू युवकाने यश मिळविले आहे.
''जिद्द व चिकाटी असल्यास कुठल्याही परीक्षेला सामोरे जाणे अवघड नाही. कुटुंबाचे प्रेम व पाठिंबा आणि जवळच्या मित्रांची साथ यामुळे हा प्रवास शक्य झाला.''- भूषण देशमुख, यशस्वी उमेदवार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.