wheat and millet  esakal
नाशिक

Nashik News : उत्पादन घटल्याने गरीबाघरची भाकरी करपली! गहु-बाजरीच्या दरात मोठी वाढ

Nashik News : महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील बाजरी महाग झाल्याने कसे जीवन जगावे, असा प्रश्‍न आज सर्वसामान्य शेतकरी व मजुरांना भेडसावत आहे.

रवींद्र मोरे

Nashik News : महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील बाजरी महाग झाल्याने कसे जीवन जगावे, असा प्रश्‍न आज सर्वसामान्य शेतकरी व मजुरांना भेडसावत आहे. लोकसभा निवडणूक झाली, आता भाव कमी होण्याची आशा धूसर आहे, अशी चर्चा ऐकू येत आहे. उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खास पसंत असलेली बाजरी महाग झाली आहे. नवीन पीक घेऊन शेतात प्रयोग करीत आहे. (Big increase in wheat and millet prices due to decline in production)

त्यामुळे बाजरी पीक घ्यायला कोणीही तयार नाही. उत्पादन घटले आहे. त्यामुळे गरीबाघरची चटणी-भाकर आता महाग झालेली आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांचा व्यापारी पीक घेण्याकडे कल वाढल्यामुळे व बाजली पिकाला खर्च अधिक असल्याने ही स्थिती आहे. सध्या बाजरीला २६०० ते ३००० रुपयांपर्यंत क्विंटलचा भाव आहे.

वर्षानुवर्ष बाजरीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असायचे. बाजरी गव्हाच्या बरोबरीला आली आहे. हॉटेलमध्ये खास भाकरीला आता ऑफर आहे. चुलीवर भाकर बनवून खवय्यांना मिळत असल्याने मागणी जास्त आहे. गव्हाचे दरही गेल्या आठवड्यात ३००० रूपये क्विंटल होते. हा दर आता ३१०० ते ३२०० रुपये झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात अत्यल्प उत्पादन झाले.

आरोग्यदायी बाजरी

पावसाळ्यात बाजरीची पेरणी प्रत्येक शेतकरी करायचा. पण, आज कुणीही बाजरीची पेरणी करीत नाही. बाजरीसाठी तांत्रिक साधने नसल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. उतारा पण येत नाही. बाजरी पेरणीपासून ते काढणीपर्यंत भरपूर खर्च येतो. मजुरही मिळत नाही. आरोग्याच्या दृष्टीने गव्हापेक्षा बाजरी चांगली आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. (latest marathi news)

"पावसाळी व उन्हाळी बाजरीचे उत्तर महाराष्ट्रात उत्पादन घटल्याने सध्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या भागातून विक्रीसाठी येत आहे. मुंबई, पुणे व नागपूर या शहरी भागात सुद्धा बाजरीला खूप मागणी आहे. पूर्वीपासून सर्वच बाजरी खायचे. गव्हाचे उत्पादन पूर्वी इतके नव्हते. आजही बाजरीचा आहारात वापर होतो. उत्पादन कमी व खर्च जास्त त्यामुळे शेतकरी बाजरी पिकाऐवजी मक्याचे पीक घेऊ लागला आहे. बाजरी पिक घेण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे." - के. बी. मोरे, निवृत्त कृषी अधिकारी, नामपूर

"बाजरी पूर्वी सर्व शेतकरी करायचे. पण, त्यावेळी मजूर मिळायचे. आता मजूर मिळत नाही. एकरी उतारा कमी आहे. नवीन वाण आले तर शेतकरी बाजरीचे पिक घेऊ शकतो. शासनाने तशी व्यवस्था करावी." - पवन ठाकरे, माजी सरपंच, खाकुर्डी

एकूण सरासरी खर्च

बियाणे : ४००

पेरणी : २५००

नांगरणी : २५००

रोटर : २५००

निंदणी : ३५००

खते : ४५००

कापणी : ३५००

काढणी : १४००

इतर : १२००

एकरी उत्पादन : १० ते १२ क्विंटल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT