Bike Theft esakal
नाशिक

Nashik Bike Theft: ‘स्मार्ट सिटी’तील दुचाकी वाहने असुरक्षितच! 2 महिन्यांत तब्बल 144 दुचाकींची चोरी

Crime News : शहर ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असताना, गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी मात्र पोलिसांकडून ‘स्मार्ट’ उपाययोजनांचा अभाव दिसून येतो आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असताना, गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी मात्र पोलिसांकडून ‘स्मार्ट’ उपाययोजनांचा अभाव दिसून येतो आहे. दुचाकी चोरट्यांनी ‘स्मार्ट’ शहरात अक्षरश: धुडगूस घातला असून, गेल्या दोन महिन्यांत १४४ दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

त्यामुळे नाशिककरांच्या दुचाकीच असुरक्षित असताना शहराच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे. तर, दुसरीकडे चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात वा परजिल्हा, परराज्यात स्वस्तात विक्रीचा चोरट्यांचा फंडा आहेच. परंतु, आंतरराज्य टोळीही सक्रिय असून या टोळीकडून चोरीच्या दुचाकी परराज्यात नेत त्यांच्या भंगारातून बख्खळ कमाई केली जाते आहे. यामुळे पोलिसांची नाकाबंदीही फोल ठरत असून, पोलिसांसमोर दुचाकी चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (Nashik bike thefts in Smart City marathi news)

जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांतील ६० दिवसांमध्ये शहरातून तब्बल १४४ दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नसले तरीही बहुतांशी ठिकाणी व्यावसायिक, दुकानदार आणि अपार्टमेंटच्या बाहेर सीसीटीव्ही आहेत. मात्र दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांचीही उदासीनता आहे.

त्यामुळे चोरट्यांचे फावत असल्याचा आरोप होत आहे. आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या ६० दिवसांमध्ये १४४ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरीचे सर्वाधिक गुन्हे पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल आहेत, त्या खालोखाल आडगाव (२०), अंबड (१९) आणि नाशिकरोड (१५) या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

चोरट्यांचा नवीन फंडा

दुचाकी चोरीची प्रचलित पद्धत मागे पडून, नव्याने आंतरराज्य टोळी सक्रिय झाल्या आहेत. परराज्यातील या टोळ्यांकडून शहरातील दुचाकी चोरट्यांशी संधान साधले जाते. सराईत दुचाकी चोरटे दुचाकी हेरून त्यांच्याकडील मास्टर-कीने ती चोरतात. त्यानंतर ती दुचाकी थेट शहराबाहेर नेली जाते.

त्याठिकाणी आंतरराज्य टोळीच्या हवाली ती केली जाते. त्या मोबदल्यात चोरट्यांना चांगले पैसे मिळतात. टोळीकडून अशा दुचाकी परराज्यात नेल्या जाऊन त्यांचे इंजिन क्रमांक, चेसीज क्रमांक आणि नंबरप्लेट खोडून त्यावर नवीन नंबर टाकले जातात.

बनावट कागदपत्रे तयार करून त्यांची विक्री केली जाते. वा, वाहनांचे सुटे पार्ट करून त्यांची भंगार बाजारात विक्री केली जाते. यातून मोठी आर्थिक उलाढाल परराज्यात होत असून, यात प्रामुख्याने मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या परिसरातील टोळ्या कार्यरत असल्याचे दिसून येते.

विम्यामुळे फक्त तक्रारीची गरज

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही वा नाकाबंदी केली जाते. परंतु दुचाकी चोरीमध्ये हे उपाय कुचकामीच ठरताहेत. सीसीटीव्हीत दुचाकी चोरीला जाताना दिसते, परंतु तक्रार येईपर्यंत दुचाकी शहराबाहेर गेलेली असते. नाकाबंदीमध्ये चोरटे हुशारीने

नाकाबंदी टाळून पोबारा करतात. दरम्यान, दुचाकींचा विमा असल्याने मालकाला केवळ तक्रारीची गरज असते. त्यामुळे पोलिसही याकडे गांभीर्याने पाहात नाहीत, अशी तक्रारदारांचीच तक्रार आहे. (Latest Marathi News)

चैनीसाठी तरुणाई चोरीकडे

अल्पवयीन, महाविद्यालयीन तरुणही दुचाकी चोऱ्या करीत असल्याचे गेल्या काही गुन्ह्यांतून निष्पन्न झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी वा इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरायची आणि १०-१५ हजारात विक्री करायची. या पैशातून चैन, मौजमजा करायची, असाही प्रकार काही घटनांमधून समोर आला आहे. पोलिसांनी काही गुन्ह्यांमध्ये सुशिक्षित तरुणांना अटकही केली आहे. काही तर प्रेयसीला खूष ठेवण्यासाठी दुचाकी चोरीकडे वळल्याचेही समोर आले आहे.

दुचाकी चोरीची आकडेवारी (ग्राफीक्ससाठी)

* पोलिस ठाणे.......जानेवारी.....फेब्रुवारी... एकूण

- पंचवटी ....... १४..........१३......२७

- मुंबई नाका ..... ६.........५.....११

- आडगाव ......७...........१३.......२०

- सरकारवाडा.....३........६......९

- उपनगर .......१........४......५

- इंदिरानगर ....... ४.......३.......७

- सातपूर ....... ६...........१........७

- नाशिकरोड ..... ९........६ .......१५

- म्हसरुळ .......२.....३.........५

- अंबड ....... ११......८ ..........१९

- भद्रकाली.....६.......४ .....१०

- गंगापूर .......४.......३...... ७

- देवळाली कॅम्प.....२......०.........२

एकूण.........७५......६९.........१४४

"आयुक्तालय हद्दीमध्ये सातत्याने नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते. गुन्हे शाखेच्या पथकांनाही दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलिस ठाणेनिहाय गस्त आणि शोध पथकांनाही सूचना केल्या आहेत."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT