BJP esakal
नाशिक

नाशिक : भाजपकडून निवडणुकीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण

विभागनिहाय समित्या; प्रभारी रावलांसह शहराध्यक्षांना धक्का

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी संघटनात्मक बदल करण्याऐवजी भाजपकडून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. विकेंद्रीकरण करताना निवडणुकीसाठी मध्यवर्ती कार्यालयात निर्णयाचे अधिकार न ठेवता विभागीय पातळीवर समिती नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीने भाजपने शिवसेनेच्या पावलावर पाऊल ठेवले असून, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह प्रभारी आमदार जयकुमार रावल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पुढील वर्षाच्या प्रारंभी नाशिक महापालिकेच्या निवडणुका होत असून, या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षात सुरू झाली आहे. भाजपमध्ये सत्ता टिकविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विकासकामांच्या जोरावर मतदारांसमोर जाण्याची व्यूहरचना असली तरी संघटनात्मक पातळीवर भाजप मध्ये ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी उफाळून त्याचा फटका बसू नये म्हणून निवडणुकीसंदर्भात निर्णय घेताना अधिकारांचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे. अशा प्रकारचा निर्णय घेताना शहराध्यक्ष पालवे यांच्याबाबत असलेल्या नाराजीचे कारण मानले जात आहे.

परंतु, निवडणुकीच्या तोंडावर बदल झाल्यास मतदारांमध्ये वेगळा संदेश जाण्याची भीती असल्याने अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्यात आल्याचे समजते. पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालय येथे शनिवारी (ता.४) बैठक झाली. प्रभारी आमदार जयकुमार रावल, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, विभागीय घटनामंत्री रवी अनासपुरे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, प्रदेश पॅनेलिस्ट लक्ष्मण सावजी, विजय साने, उप महापौर भिकूबाई बागूल, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, जगन पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेनेतही अधिकारांचे विकेंद्रीकरण

शिवसेनेत गटबाजीची चाहुल सहा महिन्यांपूर्वीच लागल्याने संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, ज्येष्ठ नेते वसंत गिते, दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांची समन्वय समिती गठित केली आहे. त्याच धर्तीवर भाजप मध्ये विभागीय स्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT