kalaram temple . bjp logo esakal
नाशिक

BJP News : भाजपचा नाशिकसाठी सुप्त 'अंडर करंट'; संघातील वरिष्ठांचा आग्रह, पुढील निर्णयाची स्थानिक भाजपला प्रतीक्षा

BJP : भाजपची पहिली यादी आल्यानंतर आता दुसऱ्या यादीचे स्वरूप अंतिम होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील काही जागांचा समावेश असू शकतो, असे संकेत मिळत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

BJP News : भाजपची (BJP) पहिली यादी आल्यानंतर आता दुसऱ्या यादीचे स्वरूप अंतिम होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील काही जागांचा समावेश असू शकतो, असे संकेत मिळत आहेत. नाशिकचे विद्यमान खासदार शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे ही जागा शिंदे गटाला जाणार असा कयास लावला जात आहे. मात्र, यासाठी भाजप तयार नाही. (nashik BJP latent under current for Nashik marathi news)

स्थानिक स्तरावर भाजप आणि संघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना ही जागा भाजपकडे असावी, असे वाटत असल्याने पुढील निर्णयाची वाट पाहिली जात आहे. नाशिक ही धार्मिक, सांस्कृतिक नगरी असल्याने भाजपला इथल्या लोकसभेच्या जागेत रस असणे स्वाभाविक आहे. भाजप कार्यकर्त्यांची ही जुनी इच्छा आहे. सध्या नाशिक लोकसभेत शहरातील तीन विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत.

देवळाली राष्ट्रवादी तर इगतपुरी-त्र्यंबकची विधानसभा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे भाजपाचा वरचष्मा असल्याने इथून भाजपचा खासदार असावा, ही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा चूक नाही. परिणामी वाटाघाटींमध्ये नाशिक भाजपच्या ताब्यात येऊ शकते, अशी आशा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघातील पदाधिकाऱ्यांना वाटते. (latest marathi news)

भाजप थेट नाशिकवर दावा सांगत नसले तरी देखील भाजपकडून सुप्तपणे नाशिकसाठी हालचाली सुरु आहेत. मित्रपक्षाची जागा बळकावल्यास भाजपाबद्दल नकारात्मकता वाढीला लागेल, असा एक मतप्रवाह पक्षात आहे. मात्र, निवडून येण्याच्या निकषात बसणे सर्वाधिक महत्त्वाचे मानल्यास नाशिकबाबत निश्चितपणे चर्चा होऊ शकते. नाशिक लोकसभेत अनेक सर्वेक्षण पार पडले आहेत.

पोलिसांचा आणि आयबीचा रिपोर्ट भाजपासाठी नाशिकमध्ये अनुकूल असल्याने वातावरण कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाशिकवर विशेष प्रेम असल्याचे जाणवल्याचे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

पंतप्रधानांनी दुसरा मतदारसंघ म्हणून नाशिकचा विचार करावा, असाही एक मतप्रवाह आहे. मात्र, असे न झाल्यास किमान इथला खासदार भाजपचा असावा, यासाठी भाजप उत्सुक आहे. आपल्या भावी नेत्यासाठी काम करायचे आणि अन्य पक्षाच्या नेत्यासाठी काम करायचे, यात मोठा फरक असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT