blind student  esakal
नाशिक

Swaekhan App : रायटर न घेता अंध विद्यार्थी पेपर लिहू शकतो; स्वलेखन ॲपची निर्मिती

Nashik News : अंध विकासालयाच्या संचालिका उमा बडवे यांनी स्वलेखन ॲपची निर्मिती करून विद्यार्थी स्वतः संगणकाद्वारे पेपर लिहू शकतो व सक्षम होऊ शकतो.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीत लिहिण्याची सवय असते; पण परीक्षांमध्ये रायटर घेऊन त्यांना परीक्षा द्यावी लागते. रायटरने बरोबर लिहिले आहे की नाही, हे तपासणे कठीण होते. त्यामुळे या प्रवर्गाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. काळात बदल झाला, तसे या विद्यार्थ्यांना रायटर मिळणे कठीण होत असून, त्यांच्या प्रगतीत अडथळा होत असतो. (blind student can write paper without a writer Creating handwriting app)

तो अडथळा होऊ नये व रायटरची आवश्यकता भासू नये, यासाठी निवांत अंध विकासालयाच्या संचालिका उमा बडवे यांनी स्वलेखन ॲपची निर्मिती करून विद्यार्थी स्वतः संगणकाद्वारे पेपर लिहू शकतो व सक्षम होऊ शकतो. या ॲपद्वारे महाराष्ट्रातील ‘नॅब’ संस्थेच्या विशेष शिक्षकांसाठी दोनदिवसीय (५ व ६ जुलै) स्वलेखन प्रशिक्षण कार्यशाळा ‘नॅब’ संकुलात नुकतीच झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महानॅब स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. हेलन केलर, लुई ब्रेल यांच्या प्रतिमांना पाहुण्यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मानद महासचिव गोपी मयूर, डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सूर्यभान साळुंखे.

डॉ. राजेंद्र कलाल, प्रा. डॉ. सिंधू काकडे व स्वलेखन ॲपच्या निर्मात्या उमा बडवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मानद महासचिव मयूर यांनी मित्तल यांचा, तर डॉ. मुनशेट्टीवार यांनी उमा बडवे यांचा सत्कार केला. प्रशिक्षक राजेश जाधव, हुसेन शेख, शुभम वाघमारे (सर्व पुणे) यांचा सत्कार डॉ. कलाल, प्रा. डॉ. काकडे व श्री. साळुंखे यांनी केला. (latest marathi news)

राज्यातील सर्व विशेष शाळेत संगणक व त्याला लागणारे ॲप आणि प्रशिक्षण झालेल्या विशेष शिक्षकांनी प्रशिक्षण दिल्याबरोबरच अद्ययावत सामग्री प्रत्येक अनुदानित व विनाअनुदानित शाळेत केजीपासून पीजीपर्यंत शासनाने उपलब्ध करून द्यावेत म्हणजे विद्यार्थ्यांना या संदर्भात सक्षम करून जीवनात त्यांची स्वप्ने पूर्ण करता येतील, त्या दृष्टीने अशा कार्यशाळेची गरज दिव्यांग क्षेत्रासाठी आवश्यक आहे.

ती गरज पूर्ण करेल व त्यासाठी शासनाचे योगदान व सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा डॉ. मुनशेट्टीवार यांनी व्यक्त केली. सहभागी प्रशिक्षणार्थींना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. विनोद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मयूर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मुनशेट्टीवार यांनी आभार मानले. रेणुका सोनवणे व शशिकांत सकट यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

"कार्यशाळेतील प्रशिक्षण ही भविष्यकाळाची गरज आहे. सध्या शिक्षण प्रणालीत ऑनलाइन परीक्षा उदयाला आली. त्यासाठी उपयुक्त ठरेल. सर्व दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना स्वलेखनाद्वारे घडविण्याचे कार्य विशेष शिक्षकांनी करावे. म्हणजे त्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT