Vice-Chancellor Dr. Yashwantrao Chavan while distributing block chain-based QR code marked mark sheets to students who passed the examination of Maharashtra Open University. esakal
नाशिक

Nashik YCMOU News : ‘मुक्‍त’च्‍या गुणपत्रिकेवर ‘ब्‍लॉकचेन’ आधारित ‘क्‍यूआर कोड’

सकाळ वृत्तसेवा

Nashik YCMOU News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या सर्व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ब्‍लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित क्यूआर कोड अंकित असणार आहे. कृषी शिक्षणक्रमाच्या मार्च २०२४ मध्ये घेतलेल्‍या परीक्षेपासून या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्‍यानुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्‍वरूपात कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्‍या हस्‍ते गुणपत्रिकेचे वाटप करण्यात आले. (Nashik Blockchain based QR Code on ycmou Marksheet )

कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सोपान वाघसरे व तेजस कसबे या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात गुणपत्रके वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये ही गुणपत्रिका कायमस्वरूपी उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची मूळ प्रत मुलाखतींसाठी बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.

या गुणपत्रकाची वैधता नियोक्त्यांना व विविध एजन्सींना ऑनलाइन तपासण्यासाठी उपयुक्त ठरणार असून, संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस स्वरूपाची असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणपत्रक पडताळणी काही सेकंदात मानवी हस्तक्षेपाविरहित वेळेत व सुलभरीत्या उपलब्‍ध होईल. या वेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील व संगणक कक्षप्रमुख प्रदीपकुमार पवार हे राबवत आहेत. (latest marathi news)

वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, डॉ. राम ठाकर, डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. नितीन ठोके, प्रा. राजेंद्र वाघ, डॉ. श्‍याम पाटील, कविता देव, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

राज्‍यातील पहिले विद्यापीठ...

ब्‍लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित क्यूआर कोड असलेले, तसेच सुरक्षित व कुठल्याही गुणपत्रकावरील मजकुरात बदल होऊ न शकणारे असे हे गुणपत्रक आहे. अशा स्वरूपाचे आधुनिक गुणपत्रक वितरित करणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे राज्‍यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

यापूर्वीच्या पदवी प्रमाणपत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग

यापूर्वी मुक्‍त विद्यापीठाने ब्‍लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित क्‍यूआर कोड असलेली पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना वितरित केली होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून ब्‍लॉकचेनवर आधारित गुणपत्रके वितरित करण्याची प्रणाली कार्यान्वित केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT