नाशिक : श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात ठेवण्यात आलेली मोठी दानपेटी कोणत्याही कायदे, नियमांचा आधार न घेता ठेवण्यात आली आहे. या दानपेटीत किती पैसे येतात, या पैशांचा वापर नेमका कसा होतो, याबाबत कोणतेही ऑडिट होत नसल्याचा आरोप देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला असून धर्मदाय आयुक्तांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विश्वस्त मंडळातर्फे करण्यात येणार आहे. कपालेश्वर मंदिरातील दानपेटीतील पैसे मुद्द्यावरुन दोन दिवसांपूर्वी काही गुरव कुटुबियांमध्ये मंदिरातच मोठा वाद निर्माण झाला होता. (Board of Trustees will request Charity Commissioner to investigate financial transactions of kapaleshwar temple )
या वादाचा व्हिडीओही समामाध्यामावर प्रसारित झाल्याने वाद चव्हाट्यावर आला आहे. दानपेटी वादाच्या पार्श्वभुमीवर देवस्थान ट्रस्टतर्फे रविवारी (ता.२२) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानच्या वतीने मंदिराच्या सभागृहात दोन छोट्या दानपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. यात जमा होणाऱ्या दानातूनच मंदिर परिसर व भाविकांच्या सुविधांसाठी उपक्रम राबविले जातात. दोन दानपेटया असताना मंदिरात गुरव कुटुंबाने अनधिकृतपणे तिसरी दानपेटी ठेवली आहे.
विशेष म्हणजे गुरवांनी ठेवलेल्या अनधिकृत दानपेटीतच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पैसे टाकण्याचा आग्रह केला जातो, असा आरोप विश्वस्त मंडळाने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या पेटीतून आतापर्यंत किती पैसे जमा झाले, या जमा होणाऱ्या पैशांचा नेमका काय उपयोग होतो का? याबाबत गुरुवांकडून कोणतीही माहिती दिली जात नाही, असे विश्वस्त मंडळाने सांगितले.
त्यामुळे यात अनधिकृतपणे ठेवण्यात आलेली ही दानपेटी ताब्यात घेऊन धर्मदाय आयुक्तांनी याबाबतच्या सर्व आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अक्षय कलंत्री, सचिव अॅड. प्रशांत जाधव यांनी केली आहे. विश्वस्त मंडळाच्या या पावित्र्यामुळे आता गुरवांमधील वादात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उडी घेतल्याने हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. यावेळी मंडलेश्वर काळे, श्रध्दा दुसाने, व्यवस्थापक श्री. जोशी उपस्थित होते. (latest marathi news)
दानपेटीवरून नव्हे तर हक्क, अधिकारावरुन वाद
श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेटीवरून वाद झाल्याची बातमी विश्वस्त मंडळाने खोडसाळपणे दिली आहे. खरेतर हा वाद दानपेटीवरून नव्हे तर मंदिरातील वंशपरांगत हक्क व अधिकारांबाबत आहे, ही बाब न्यायप्रविष्ठ असूनही हेतूपुरस्सर वेगळा रंग देण्याच प्रयत्न असल्याचे मंदिरातील गुरव, पुजाऱ्यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
वास्ताविक गुरव, पुजाऱ्यांमध्ये कोणताही वाद नसल्याचा दावा करून काहींनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचा आरोप पुजारी व गुरव वर्गाने करत मंदिरातून हाकलून लावण्याचे हे षडयंत्र असल्याचेही सांगितले. गुरवांचे हक्क, अधिकारांबाबतचा वाद न्यायप्रविष्ट असताना हेतुपुरस्सर बदनामी करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही यावेळी गुरव, पुजारी वर्गाने पत्रकातून केला आहे. पत्रकावर शाम गाढे, अतुल शेवाळे, अनिता शेवाळे, पी.जी. जगताप आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विश्वस्तांच्या नेमणूका बेकायदा
विद्यमान विश्वस्त मंडळाच्या नेमणुका बेकायदेशीरपणे झाल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला असून याबाबत मुंबई उच्च न्यायालयात वाद न्यायप्रविष्ट आहे. मंदिराची प्रतिष्ठाही जपली जात आहे, मात्र प्रसारित झालेल्या व्हिडिओमधून गुरव व पुजारी वर्गाची बदनामी केली गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.