A team of disaster management and fire brigade while removing the body of a dead youth from the Godavari riverbed at Gangawadi. esakal
नाशिक

Nashik News : रामतीर्थावरून वाहून गेलेल्यायुवकाचा मृतदेह सापडला; 3 दिवसांच्या प्रयत्नांनी आपत्ती निवारणला यश

Nashik : २९ वर्षीय यग्नेश पवार (रा. ओझर) यांचा मृतदेह मंगळवारी (ता. ६) सायंकाळी गंगावाडी येथील रेल्वेपुलाखाली असलेल्या पानवेलीत सापडला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गोदावरी नदीला रविवारी (ता. ४) आलेल्या पुरात गोदाघाटावरून वाहून गेलेल्या २९ वर्षीय यग्नेश पवार (रा. ओझर) यांचा मृतदेह मंगळवारी (ता. ६) सायंकाळी गंगावाडी येथील रेल्वेपुलाखाली असलेल्या पानवेलीत सापडला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून गेल्या तीन दिवसांपासून शोधकार्य सुरू होते. यग्नेश पवार हा रविवारी (ता. ४) सकाळी गोदाघाटावर कालसर्प योगाची पूजाविधी करण्यासाठी कुटुंबीयांसह आलेला होता. (body of youth who was swept away from Ram Tirtha was found)

निळकंठेश्वर मंदिराजवळ पूजा आटोपल्यानंतर तो पुराच्या पाण्यात पाय धुण्यासाठी गेला असता, त्याचा पाय निसटला आणि तो तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडला. काही क्षणात तो पुराच्या पाण्यात दिसेनासा झाला. डोळ्यांदेखत मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. तेव्हापासून यग्नेश पवार याचा शोध सुरू होता. परंतु दोन दिवस उलटूनही अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यग्नेशचा मृतदेह सापडला नव्हता.

मंगळवारी (ता. ६) दुपारी पुन्हा नाशिक रोड अग्निशमन दलाचे पथक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून एकलहरे परिसरातील नदीपात्रात शोध सुरू होता. त्या वेळी गंगावाडी- मांडसांगवी येथील रेल्वे पुलाखाली असलेल्या पानवेलींमध्ये काहीतरी अडकलेले असल्याचे स्थानिक मासेमाऱ्यांनी पथकाला सांगितले. त्यानुसार, पथकाने शोधमोहीम सुरू केली असता, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पानवेल्यांमध्ये अडकलेला यग्नेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सदरचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे आपदा मित्र शिवम हारक, अथर्व लोहगावकर, किरण खैरे, तर नाशिक रोड अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय बागूल, वाहनचालक फकिरा भालेराव, लिडिंग फायरमन उमेश गोडसे, तानाजी भास्कर, राजेंद्र सोनवणे, प्रथमेश पुरी, सागर गिरजे या पथकाने परिश्रम घेतले.

''रविवारपासून टप्प्याने आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सुरू असताना गंगावाडी- माडसांगवी रेल्वेपुलाखालील गोदापात्रात युवकाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी सापडला.''- शिवम हारक, आपदा मित्र, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT