Nashik News : राज्य शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार्य आंदोलन सुरू असून, प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी (ता. २६) जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा काढण्यात आला. या वेळी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा बालविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी निवेदन देण्यात आले. (Anganwadi Employee)
राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे एक लाख १३ हजार अंगणवाडी केंद्रांत दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. मानधन वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युइटी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत एकूण ५२ दिवसांचा राज्यव्यापी संप केला होता.
संपाची तडजोड करताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी आशा कर्मचारी यांचे मानधन वाढ झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात येईल, असे लेखी आश्वासन संघटनेला दिले होते. परंतु महिला व बालविकास विभाग खात्याने त्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे.
राज्य सरकारच्या या अनास्थेच्या वृत्तीबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी १५ जुलैपासून असहकार्य आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात अंगणवाडीसेविका, अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामाने मासिक अहवाल देणार नाही, मासिक सभेत व शासकीय बैठकांमध्ये बहिष्कार टाकलेला आहे. तसेच राज्यभर जिल्हा परिषद कार्यालयावर निदर्शने केली आहेत. (latest marathi news)
मात्र, शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शासनाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयावर गाजर मोर्चा काढला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात राजेश सिंह, भगवान डवणे, पदमा भुजबळ, मीरा जाधव, संगीता कासार, जया गरड, चंद्रकला बत्तासे, मोहिनी गाजरे, अरुणा बाबा आदी सहभागी झाले होते.
त्र्यंबक रोड जाम
अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. त्या वेळी त्र्यंबक रोडवर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला. एक ते दीड तास हा ठिय्या होता. त्यामुळे त्र्यंबक रोड वाहतुकीसाठी बंद होता. रस्ता बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.