Nashik Bribe Crime : दिवाणी प्रकरण जमा करण्यापूर्वी तक्रारदार हे त्यांचे प्रकरण कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून मिळण्यासाठी गेले असता, त्या मोबदल्यात जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षकाला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. ९) दुपारी सदरची कारवाई केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Assistant Superintendent of District Court arrested by ACB for taking bribe)
दिवाणी न्यायालयाचे सहायक अधीक्षक मनोज दत्तात्रय मंडाले असे लाचखोराचे नाव आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या संमतीशिवाय शेतीचे केलेले खरेदीखत रद्द करण्याचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करायचा होता. सदरचा दावा दाखल करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो. कोर्ट फी स्टॅम्प रक्कम भरल्यानंतर सदरचे प्रकरण मंडाले याच्याकडे जमा करावे लागते.
परंतु सदरची कोर्ट फी स्टॅम्प रक्कम प्रकरण जमा करण्यापूर्वी मंडाळे याचेकडून काढून न घेतल्यास ते सदर प्रकरणात त्रुटी काढतात. त्यामुळे सदर प्रकरण जमा करण्यापुर्वी तक्रारदार हे त्यांचे प्रकरण कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून मिळण्यासाठी मंडालेकडे गेले असता त्या मोबदल्यात व सदर प्रकरणात सहकार्य करण्यासाठी मंडाले याने बुधवारी (ता.८) तक्रारदाराकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. (Latest Marathi News)
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, विभागाने पडताळणी करून गुरुवारी (ता.९) दुपारी लाच स्वीकारताना मंडाले यास अटक केली. सदरची कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके यांनी बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.