Nashik Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : लाचखोर कंत्राटी वीज तंत्रज्ञान कर्मचाऱ्यास अटक; लाचलुचपतच्या पथकाची येवल्यात कारवाई

Nashik Bribe Crime : लाच स्वीकारणाऱ्या कंत्राटी वीज तंत्रज्ञान कर्मचाऱ्यास लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केले सदरची कारवाई येवला येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात झाली.

सकाळ वृतसेवा

नाशिक : नवीन घरी वीज मीटर फसविण्यासंदर्भात विजिट करण्यासाठी 700 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कंत्राटी वीज तंत्रज्ञान कर्मचाऱ्यास लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केले सदरची कारवाई येवला येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात झाली. अनिल भास्कर आव्हाड (42, रा. राजापूर, ता. येवला, जि. नाशिक) असे संशयित लाचखोराचे नाव आहे. ( nashik Bribery contractor electrical technician arrested marathi news )

तक्रारदार यांचे नातेवाईकाच्या घरी नवीन वीज मीटर बसविण्यासाठी येवला येथील वीज वितरण कंपनीकडे ऑनलाइन अर्ज केला होता. ऑनलाइन फॉर्म भरून मिळालेल्या पावतीवर सही करण्यासाठी, अर्जदार यांच्याघरी भेट देण्यासाठी, व फॉर्ममध्ये माहिती भरून देण्याच्या मोबदल्यात आव्हाड याने तक्रारदारकडे सातशे रुप्याची लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने शहानिशा केल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या येवला येथील कार्यालयात सापळा रचला त्यावेळी तक्रारदाराकडून लाचेची सातशे रुपयांची रक्कम घेताना लाचखोर आव्हाड यास दबा धरून असलेल्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

याप्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन पाटील, नितीन चौधरी, शितल सूर्यवंशी यांनी केली. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: महाराष्ट्राचा निकाल लागताच कंगनानं उद्धव ठाकरेंना दैत्य संबोधलं! म्हटलं...

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: पहिला दिवस संपला! स्टार खेळाडूंनी भाव खाल्ला; अनेक खेळाडू झाले मालामाल

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

IND vs AUS 1st Test: ४ बाद, १७ धावा! टीम इंडियाचा दरारा; ऑस्ट्रेलियात मोडला ११३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT