Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: लाचखोर महिला GST अधिकाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bibe Crime : दोन वर्षापासुन बंद असलेल्या कंपनीचा व्यवसायकर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जीएसटी महिला अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

स्नेहल सुनिल ठाकुर (52, पद - व्यवसाय कर अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी कार्यालय, क्रुषि औद्यागिक संघ लि., द्वारका, नाशिक.) रा. आश्विन हॉटेलजवळ, आश्विन संकुल रो हाऊस, आश्विन नगर, नाशिक) असे लाचखोर जीएसटी महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. (Nashik Bribe Crime Bribery woman GST officer arrested)

तक्रारदार यांची कल्पदीप इंडस्ट्रियल सेक्यूरिटी सर्विसेस ही कंपनी दोन वर्षापासुन बंद असल्याने तिचा व्यवसायकर रद्द व्हावा यासाठी गेल्या 13 तारखेला व्यवसाय कर अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज केला होता.

सदर व्यवसायकर रद्द करून द्यायचे मोदबल्याततील स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 5 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती 4 हजार देण्याचे ठरले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सायंकाळी व्यवसाय कर कार्यालयात सापळा रचला तक्रारदाराकडून लाचीची 4000 ची रक्कम स्वीकारल्यानंतर दबा धरून असलेल्या पथकाने श्रीमती ठाकूर यांना रंगेहात अटक केली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर आधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजीत जाधव, हवालदार प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे, शितल सूर्यवंशी, संतोष गांगुर्डे यांनी कामगिरी बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT