Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: भागीदारीतील वाईन शॉपमध्ये भावानेच गंडविले; संशयिताने स्वत: च्या क्युआर कोडवर घेतल्या रकमा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : सातपूर येथे दोघा भावांनी भागीदारीतून वाईन शॉप सुरू केले. मात्र यातील एकाने मद्याच्या विक्रीतून येणारी रक्कम भागीदारीतील खात्यावर न घेता, स्वत:च्या फायद्यासाठी वैयक्तिक बँक खात्यावर जमा केली. त्यासाठी दुकानात स्वत:च्या बँक खात्याचा क्युआर कोडचाही वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यातून सुमारे ६८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Brother conned wine shop in partnership)

गोकूळ नामदेव निगळ (५५, रा. निगळ गल्ली, सातपूर गाव) असे संशयिताचे नाव आहे. जगन्नाथ नामदेव निगळ (६९, रा. निगळ गल्ली, सातपूर गाव) यांच्या फिर्यादीनुसार, दोघा भावांनी हेवर्डस्‌ ५००० या वाईन शॉपसाठी परवाना घेऊन ५०-५० टक्के भागीदारीमध्ये सातपूर गावात वाईन शॉप सुरू केले. यासाठी जगन्नाथ निगळ यांनी त्यांच्या निगळ कृषी सेवा केंद्र या संस्थेच्या नावावर कर्ज काढले.

मात्र, संशयित गोकूळ यांनी २०१४ ते जुलै २०२४ या दरम्यान, दुकानात येणारी रक्कम भागीदारीत असलेल्या बँक खात्यावर टाकली नाही. तर उलट स्वत:च्या फायद्यासाठी त्या रकमा स्वत:च्या बँक खात्यावर जमा केल्या. त्याचप्रमाणे, वाईन शॉपमध्येही ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी क्युआर कोड ठेवला. (latest marathi news)

परंतु तो क्युआर कोडही संशयित गोकुळ यांनी स्वत:च्या वैयक्तिक बँकेचा ठेवला होता. त्यामुळे ऑनलाईन व्यवहाराच्या रकमाही त्यांच्याच खात्यात जमा झाल्या आहेत. यातून भागीदार भाऊ जगन्नाथ निगळ यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पाटील हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT