Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांची गस्ती कुचकामी

Nashik Crime News : शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वी गंगापूर परिसरात जबरी चोरीची घटना घडल्यानंतरही ढिम्म पोलिस यंत्रणेला आव्हान देत चोरट्यांनी शहरात चोऱ्या-घरफोड्यांचे सत्रच सुरू केले आहे. पुन्हा दोन घरफोड्या आणि दोन चोऱ्यांमधून चोरट्यांनी तब्बल ५ लाख ७९ हजारांवर डल्ला मारला आहे. (Nashik Burglary Crime increase in city)

तर, दुसरीकडे पोलिसांची गस्ती कुचकामी ठरत असल्याने वारंवार समोर येत असतानाही त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने गस्ती पथकांचेही फावते आहे. शहरात चोरट्यांनी राजीवनगर येथे बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडनू १ लाख ३७ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेत घरफोडी केली. ऐश्वर्या जितेंद्र बुरड (रा. संभव अपार्टमेंट, राजीवनगर) यांच्या फिर्यादीनुसार, १७ ते १९ तारखेपर्यंत त्यांचे घर बंद होते.

या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घरफोडी केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घरफोडी तर चोरट्यांनी आर्टिलरी सेंटरमध्येच केली आहे. याठिकाणी कडेकोट सुरक्षा असतानाही बंद घराच्या मागील दाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख ६४ हजारांचे सोन्याचे दागिने.

रोकड असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. नायब सुभेदार सुधीर यादव (रा. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. २०) सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ या दरम्यान सदरील घरफोडी झाली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झोपलेल्या महिलेची पोत चोरली

नाशिकरोड येथे बेडरुममध्ये झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात संशयिताने खिडकीतून हात टाकून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. ७४ वर्षीय मीरा हिरामण गायकवाड (रा. साफल्य, पंचशिल हौसिंग सोसायटी, चव्हाण मळा, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, सध्या वातावरणात प्रचंड उकाडा असल्याने वयोवृदध मीरा गायकवाड या बेडरुमच्या खिडकीजवळ झोपलेल्या होत्या.

मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ९५ हजारांची सोन्याची गोफ असलेली चैन खिडकीतून हात टाकून चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामार्गावर पुन्हा चोरी

मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात आलेल्या महिलेच्या पर्समधील १ लाख ८३ हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याचा प्रकार घडला. रामहरी दगडू बिन्नर (रा. लोकमान्य नगर, ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, ते पत्नीसह रविवारी (ता. २१) पाऊणच्या सुमारास महामार्ग बसस्थानकात आले होते.

बस फलाटावर लागल्यानंतर दोघे बसमध्ये चढत असताना गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ८३ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT