Nashik Accident 
नाशिक

Nashik Accident: यंत्रणा ठरल्या फोल; दीड तास कोणी फिरकलंच नाही!

सकाळ डिजिटल टीम

नाशिकमध्ये आज पहाटे भीषण अपघात झाला. एका खासगी बसला कंटेनरची धडक बसली आणि त्यानंतर या बसने पेट घेतला. या भीषण अपघातामध्ये १२ जणांना होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर मदतही उशीरा पोचल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी प्रशासनाचा फोलपणा उघडकीस आला आहे.

पहाटे ४:३०- ५ च्या सुमारास अपघात झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी तातडीने 100, 112 या क्रमांकांवर संपर्क साधले. अँब्युलन्सला फोन केला, अग्निशमन दलाशीही संपर्क साधला. परंतु सहा वाजेपर्यंत घटनास्थळी कोणीही पोहोचू शकले नाही. पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना शहर बसमधून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मृतांनाही याच बसमधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. बराच वेळाने 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. एकूणच या घटनेमध्ये आपत्कालीन व्यवस्था फोल ठरल्याचे दिसून आले.

या घटनेनंतर मनपा आय़ुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दल उशीरा पोहोचल्याची तक्रार त्यांच्याकडे केली. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातावेळी बसमधील बहुतांश प्रवासी पहाटेच्या गाढ झोपेत होते. त्यामुळे अनेकांना आपला जीव वाचवता आला नाही. अनेक प्रवाशांनी बसच्या खिडकीतून रस्त्यावर उड्या घेतल्या. काही प्रवासी हे आगीत होरपळून बाहेर पडले. मात्र त्यांना मदत न मिळाल्याने त्यांचे जागीत प्राण गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

Satara Crime : घरात जेवण बनविण्याच्या वादातून पतीने केला पत्नीचा खून; लाथाबुक्क्या, लाकडी काठीने बेदम मारहाण

'या' तारखेला सामांथाचा पूर्वाश्रमीचा नवरा अडकणार पुन्हा लग्नबंधनात ; पत्रिकेचा फोटो झाला व्हायरल

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : निवडणूक प्रचाराकडे रोजंदारी मजुरांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT