Nashik Accident News  esakal
नाशिक

Nashik Accident News : बस-ट्रकची धडक! दोन्ही चालक गंभीर; पेठ रस्त्यावरील अपघात

सकाळ वृत्तसेवा,

Nashik News : पेठ-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याने एकीकडे घाटातील वाहतूक कोंडी तर दुसरीकडे अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे हा महामार्ग वाहन चालकांना धोक्याचा ठरत आहे. मंगळवारी (ता.२) सायंकाळी पेठ आगाराची बस व आयशर ट्रक यांच्यात धडक झाली. यात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. (Bus and truck crash Both drivers serious Peth road accident)

पेठ-पुणे ही बस (क्रमांक एमएच-१४-बीटी-४२०८) काही प्रवासी व शालेय विद्यार्थी घेऊन नाशिककडे जाताना देवगाव फाटा पुलाजवळील वळणावर नाशिककडून भरधाव येणाऱ्या आयशर (एमएच ०४ एफपी-१०५२) वरील चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले.

यामुळे वळणावर समोरून येणाऱ्या बसला जोरात धडक देत ट्रक उलटला. या अपघात ट्रकचालक रामेश्वर लहानू पाटील (वय ३२, रा. नाशिक) व बसचालक व्यंकटी विठ्ठल गिते (वय ४०, रा. पेठ) गंभीर जखमी झाले. (latest marathi news)

तर बसमधील सुमारे २२ ते २५ प्रवासी व शालेय विद्यार्थी जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याबरोबर जखमींना रुग्णवाहिका, बस व खासगी वाहनाद्वारे रूग्णालयात हलवले. यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT