पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बस आगारात मुक्कामासाठी असलेल्या चालक व वाहकांना सकाळी थंड पाण्याने आंघोळी करावी लागायची. विशेषत: हिवाळा, पावसाळ्यात कर्मचाऱ्यांचे अधिक हाल व्हायचे. ही गैरसोय ओळखून सरपंच भास्करराव बनकर यांनी आगराला सोलर वॉटर भेट दिले. येथील आगारात हा कार्यक्रम झाला. नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया अध्यक्षस्थानी होते. (Nashik Water solar gift from Sarpanch Bhaskarrao Bunkar pimplegaon baswant marathi news)
सरपंच भास्करराव बनकर म्हणाले, की एसटी महामंडळाचा संचालक म्हणून महामंडळांशी ऋणानुबंध निर्माण झाले होते व त्याच नात्यातून कामगारांना मदत करण्याची आपली नेहमीच भावना आहे. टोल कमी करण्यासाठी सहकार्य करणार आहे. महामंडळानेही पिंपळगाव बसवंत बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी बस येतील, यासाठी सहकार्य करावे.
विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी एसटी महामंडळ पिंपळगाव बसवंत व परिसरातील प्रवाशांना सर्व सहकार्य करेल, असे सांगून सरपंच भास्करराव बनकर यांनी सरपंच निधीतून पिंपळगाव आगारात सोलर बसवून दिल्याबद्दल आभार मानले. (latest marathi news)
प्रारंभी आगार व्यवस्थापक मनोज गोसावी यांनी प्रास्ताविक केले. संदीप कुयटे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य केशवराव बनकर, दशरथ मोरे, दत्तात्रय मोरे, सत्यजित मोरे, आशिष बागूल, विष्णुपंत गांगुर्डे व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.