Bus Accident Sakal
नाशिक

Nashik Bus Accident : "डोळ्यादेखत लोकांचा कोळसा होत होता, मी 2-3 जणांनाच वाचवू शकलो"

मागच्या बाजून लोकं उतरत होती, सगळी लोकं पेटलेली होती, सैरावैरा पळत होती.

दत्ता लवांडे

नाशिक : "यवतमाळकडून बस आली अन् जळगावकडून कंटेनर आला होता. त्यांच्यात झालेल्या अपघातात बसने पेट घेतला, पुर्णपणे बस जळाली, सुरूवातील बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला आणि गाडीचे पूर्ण फर्निचर जळून खाक झाले. मागच्या बाजून लोकं उतरत होती, सगळी लोकं पेटलेली होती, सैरावैरा पळत होती. काही लोकांचा आमच्याडोळ्यादेखत पूर्णपणे कोळसा झाला पण आम्ही काही करू शकलो नाही. अग्निशामक दल इथून एक किलोमीटर लांब असल्यामुळे त्यांना यायला अर्धा तास उशीर झाला" अशी भावना अपघातातील प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

(Nashik Bus Fire Accident News)

दरम्यान, आज पहाटे नाशिक येथील नांदूर नाका येथे खासगी बसचा अपघात झाला आणि त्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 30 ते 32 जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून सदर घटनेचा तपास चालू आहे.

घटनेनंतर अनेक स्थानिकांनी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला पण आगीमुळे त्यांना मदत करता आली नाही. त्यांनी प्रशासन व्यवस्थेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे घटनेमध्ये जास्त मृत्यू झाल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलं.

"बस जळत होती, सगळे लोकं सैरावैरा पळत होती, बघण्याशिवाय कुणीच काही करू शकत नव्हतं. मी दोन तीन लोकांनाच वाचवू शकलो, बसच्या आगेची दाहकता एवढी होती की, बसजवळ कुणीच जाऊ शकत नव्हतं. बसपासून 50 फूटावर असलेला बोर्डसुद्धा आगीच्या दाहकतेने जळाला, अनेक लोकं तरफडत पडली होती, कुणाच्या किंचाळ्या ऐकायला येत होत्या तर लहान मुले रडत होते, अॅम्ब्युलन्स खूप उशीरा आली. तोपर्यंत आम्ही जेवढी जमेल तेवढी मदत केली" असं प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी सांगितलं.

असा घडला अपघात

शनिवारी पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास औरंगाबाद कडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात चिंतामणी ट्रॅव्हल्स येत होती. त्याचवेळी अमृतधाम चौफुली कडून टाकळी रोडच्या दिशेने कोळशाने भरलेला आयशर ट्रक भरधाव वेगात येत होता मिरची हॉटेल समोरील चौफुलीवर या दोन्ही वाहनांची क्रॉस धडक झाली धडक इतकी भीषण होती की बस ने आयशर ट्रकला सुमारे 500 ते 600 मीटर ढकलत नेली बसच्या धडकेत आयशर ट्रकचा डिझेल टॅंक फुटल्याने पेट घेतला आणि त्यानंतर काही क्षणात बस पेटली. अपघात ग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटा हत्ती वाहनावर जाऊन धडकले. या अपघातात बस चालक जागेवरच ठार झालाय.

यंत्रणा ठरली फोल

पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास अपघात झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही जागृत नागरिकांनी तातडीने 100, नंबर 112, रुग्णवाहिका 108, अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी संपर्क साधले परंतु सहा वाजेपर्यंत घटनास्थळी कोणीही पोहोचू शकले नाही. पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना शहर बस मधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृतांनाही याच बस मधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बऱ्याच वेळाने 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेमध्ये आपत्कालीन व्यवस्था फोल ठरल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT