सटाणा : येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पंचक्रोशीतील ३६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. सध्या सटाणा बसस्थानकापासून दोन किलोमीटर अंतर विद्यार्थ्यांना पायी किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत होता.
आता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून महाविद्यालयापर्यंत सलग बस पास सुविधा मिळणार आहे. या बाबतचे पत्र सटाणा आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र आहिरे यांनी प्राचार्य डॉ. मेधणे यांना दिले. (Nashik Bus pass facility for students from village to college)
१९६७ पासून सटाणा महाविद्यालयास गुणवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा आहे. महाविद्यालयाच्या या यशस्वी वाटचालीत संस्थाचालक, प्राध्यापकांसोबतच आजी-माजी विद्यार्थ्यांचेही महत्वाचे योगदान राहिले आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. नितीन मैंद हे सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागाचे महाव्यवस्थापक आहेत.
त्यांच्या विशेष सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट आता थांबणार आहे. त्याबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, महिला संचालिका शालनताई सोनवणे व बागलाण तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनावणे यांनी श्री. मैंद, राजेंद्र आहिरे यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.