Officials of NIMA, officials of ST Corporation, entrepreneurs and workers welcoming the bus at Industrial Estate. esakal
नाशिक

Nashik News : नाशिक ते माळेगाव एमआयडीसी दरम्यान बस सेवा सुरु

Nashik News : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराकडून नाशिक ते माळेगाव औद्योगिक वसाहत या मार्गावर बस फेरी सुरू करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराकडून नाशिक ते माळेगाव औद्योगिक वसाहत या मार्गावर बस फेरी सुरू करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात दोन व सायंकाळी दोन बस या मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे नाशिक, नाशिक रोड, शिंदे या भागातून माळेगाव औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या महिला कामगारांचा प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात निमा या उद्योजकांच्या संघटनेच्या वतीने नाशिक ते मुसळगाव औद्योगिक वसाहत दरम्यान एसटी बस सेवा सुरू करावी यासाठी नाशिकचे विभाग नियंत्रण भरत शेळके यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकातून माळेगाव औद्योगिक वसाहतीतील वाडीलाल कारखान्यापर्यंत बस फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या बसचे माळेगाव वसाहतीत निमाच्यावतीने स्वागत करण्यात आले.

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सिन्नर विकास उपसमितीचे चेअरमन किरण वाजे, किरण बडगुजर, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक भरत शेळके यांच्या हस्ते बसचे पूजन करून चालक व वाहका यांचा सत्कार करण्यात आला. सिन्नर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये कामाच्या ठिकाणी पोचण्यासाठी कामगारांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागायचा.

खासगी प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत असल्याने महिला कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. मात्र एसटी महामंडळाकडून औद्योगिक वसाहतीतील शेवटच्या कारखान्यापर्यंत जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध झाल्यामुळे महिला कामगारांना सुरक्षितता मिळाली असल्याचे श्री. बेळे यांनी सांगितले. (latest marathi news)

सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेला एसटी महामंडळाकडून नेहमीच प्राधान्य देण्यात येत आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीतून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या काळात अत्याधुनिक बस मिळाव्यात यासाठी प्रयत्न करू असे सिन्नरचे वाहतूक नियंत्रक तरुण नरवडे यांनी सांगितले.

असे आहे बसचे वेळापत्रक

ठक्कर बाजार बस स्थानक येथून पहाटे ५:४५ व ७.४५ वाजता अशा दोन बस सुटतील. प्रवास मार्गातील सर्व थांब्यांवर प्रवासी चढउतार केली जाईल. अनुक्रमे ६:४५ व ८.४५ वाजता या बस माळेगाव वसाहत येथील वाडीलाल कंपनी थांब्यावर येतील. तर सायंकाळी ६:४५ व ७.४५ वाजता याप्रमाणे नाशिक साठी दोन बस सुटतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT