Workers towing the parking lot on Pandit Colony road esakal
नाशिक

Nashik News : वर्दळीची ठिकाणं ‘टोईंग’ला नकोशी सोयीच्या रस्त्यांवरच वाहनांची होते टोईंग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणार्या वाहनांची शहर वाहतूक पोलीस शाखेकडून टोईंग केली जातात. परंतु सतत वाहतूक कोंडी होणार्या ठिकाणांवरील वाहनांची टोईग करण्याऐवजी काही ठराविक मार्गांवरील वाहनांचीच टोईंग केली जाते. तर, रहदारीला अडथळा ठरणार्या बेशिस्त वाहनांची टोईंग होत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. (Busy places are not suitable for towing vehicles are being towed only on convenient road )

शहरातील वाहतूक सुरळीत रहावी, रहदारीला अडथळा ठरणार्या वाहनांची टोईंग करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस शाखेकडून टोईंगची कारवाई केली जाते. परंतु असे असतानाही शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकलेली नाही. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दीड वर्षाच्या खंडानंतर पुन्हा टोईंग कारवाई सुरू केली. मात्र त्यानंतरही वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकलेली नाही.

शहरातील महात्मा गांधी रोड, नेहरू गार्डन, शालिमार चौक, जिल्हा परिषद रस्ता, शरणपूर रोड, पंडित कॉलनी, स्मार्ट रोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडीची समस्या असते. परंतु वाहतूक शाखेकडून मात्र पंडित कॉलनी, टिळकवाडी रस्ता, कॉलेजरोड या रस्त्यांवरच चारचाकी वाहनांची टोईंग केली जाते. तर, महात्मा गांधी रोड, स्मार्ट रोड याठिकाणी दुचाकी वाहनांची टोईंग केली जाते. (latest marathi news)

महात्मा गांधी रोड, जिल्हा परिषद रोड, स्मार्ट रोड याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहनांची बेशिस्तपणे पार्किंग केली जाते. बर्याचदा वाहतुकीला रस्ता अरुंद होऊन कोंडीची गंभीर समस्या निर्माण होते परंतु तरीही या ठिकाणी चारचाकी वाहनांची टोईंग होत नाही. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होऊन सर्वसामान्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागते.

पोलीस पाटीची नॅनोमुळे अडथळा

महाराष्ट्र शासन, भारत सरकार, पोलीस अशा पाट्या असणार्या खासगी वाहनांवर शहर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होत असतानाही, महात्मा गांधी रोडवर ‘पोलीस’ अशी पाटी असलेली नॅनो कारमुळे वाहतुकला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यावरच पार्क करून चालक निघून गेला मात्र त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या उद्‌भवली होती.

''रहदारीच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांची टोईंग केली जाते. तसेच इ-चलानद्वारे ऑनलाइन दंडही आकारला जातो. काही रस्त्यांवर तसे होत नसल्यास संबंधितांना कारवाईच्या सूचना केल्या जातील.''-चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

China Open 2024 : मालविका बन्सोडचा पुन्हा धडाकेबाज विजय; चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

Latest Marathi News Updates : आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅक कोसळला; 42 गाड्यांचे बदलले मार्ग

IIFL Finance: आरबीआयने IIFL फायनान्सला दिला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे, कंपनीच्या शेअर्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT