Nashik Leopard Attack esakal
नाशिक

Nashik Leopard Attack : नांदूर शिंगोटेत बिबट्याचा वावर; हल्ल्यात वासरू ठार!

Nashik News : नांदूर शिंगोटे येथे बुधवारी रात्री दहा वाजता गोठ्यावर बिबट्याने हल्ला करून एक वासरू ठार केल्याची घटना घडली.

प्रकाश शेळके

नांदूर शिंगोटे : येथे बुधवारी रात्री दहा वाजता गोठ्यावर बिबट्याने हल्ला करून एक वासरू ठार केल्याची घटना घडली. असाच प्रकार आठ दिवसापूर्वी घडला होता. परिसरामध्ये बिबट्याचा वावर असून, बिबट्याला त्वरित बंदिस्त करण्यासाठी वन विभागाने या भागात पाहणी करून पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केले आहे. (Calf killed in Nandur Shingote leopard attack)

दत्तात्रय विठोबा सानप यांच्या वस्तीवर गोठ्यावर बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केले. हल्ला केल्याचा प्रकार त्यांचे बंधू भारत सानप यांनी प्रत्यक्ष अनुभवला. घरालगत असलेल्या गोठ्यावर सानप यांच्या आठ मोठ्या गाई व तीन वासरे बांधलेली होती.

बिबट्याने वासरावर हल्ला केल्यामुळे वासरू व कुत्र्यांनी आवाज आला. यामुळे भारत सानप बाहेर येताच त्यांना बिबट्या जवळच असलेल्या मक्यच्या शेतात पळून जाताना दिसला. सानप यांच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आसपासच्या शेतकऱ्यांना झालेला प्रकार सांगितला. (latest marathi news)

सानप यांच्या वस्ती जवळूनच जाणाऱ्या रस्त्याने बोगद्याची वाडी या ठिकाणी असलेल्या लहान मुलांना याच ठिकाणी दररोज शाळेसाठी येणे- जाणे आहे. साधारणता दररोज या रस्त्याने ५० मुलांना ये- जा करावी लागते.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मका व सोयाबीन असल्याने बिबट्या कुठेतरी दिवसभर दडून बसलेला असू शकतो. यामुळे या भागात शेतकरी वर्गामध्ये पूर्ण भीतीचे वातावरण पसरलेले आहे. असाच प्रकार आठ दिवसापूर्वीच सुधीर शेळके यांच्या येथेही बिबट्याने हल्ला केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT