Mahayuti esakal
नाशिक

Nashik East Assembly Constituency : महायुतीची आघाडी कायम, भविष्यात मात्र आव्हान

Assembly Constituency : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व मतदारसंघात महायुतीसाठी आशादायक चित्र लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले.

योगेश मोरे

Nashik East Assembly Constituency : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व मतदारसंघात महायुतीसाठी आशादायक चित्र लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले. जवळपास अकरा हजार मतांचा लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळाला. परंतु असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या उमेदवारांना अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट होते. पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. ( candidates of Mahayuti will have to work harder in view of upcoming assembly elections )

याच मतदारसंघांमध्ये पंचवटी विभागात शिवसेनेसह अन्य पक्षांचे नामोनिशाणदेखील नाही. एक जागा वगळता सर्व नगरसेवक हे भाजपचे आहे. भाजप उमेदवारांना बूस्ट देणारा गुजराती मतदार याच भागात आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची भिस्त या मतदारसंघावर होती. अपेक्षेप्रमाणे या मतदार संघातून लीड मिळाला, मात्र तो लीड मागील म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत कमी आहे.

त्यामुळे पुढील चार महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला येथून मोठी कसरत करावी लागेल असे दिसते. जवळपास एक लाखांच्या वर मतदान महायुतीच्या उमेदवाराला झाले, तर जवळपास ९० हजार मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नांदूर नाक्याच्या त्या पलीकडील म्हणजे नाशिक रोड व जेल रोड भागातील मतदारांनी साथ दिल्याचे दिसून येत असले तरी भाजपच्या मतांचा टक्काही येथे वाढला आहे. महायुतीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून अपेक्षा होती, ती पूर्ण झाली. महाविकास आघाडीला इतर मतदारसंघांमध्ये यश मिळाले असले तरी विधानसभेत मात्र पूर्व विधानसभा मतदारसंघ सोपा नसल्याचे दिसून येत आहे. (latest marathi news)

आघाडीची कारणे

- आमदार ॲड. राहुल ढिकले यांचा जनसंपर्क.

- भाजपचा पारंपारिक मतदार.

- आमदारांनी केलेली कामे व कार्यकर्त्यांचे जाळे.

- ग्रामीण भागातील मतदारांची साथ.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा.

पिछाडीची कारणे

- पंचवटी विभागात कार्यकर्त्यांचे जाळे नसणे.

- भाजपचा प्रभावी प्रचार यंत्रणा.

- तळागाळापर्यंत शिवसेनेच्या नेटवर्कचा अभाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT