CCTV eyes on Rang Panchami celebration  esakal
नाशिक

Nashik Rangpanchmi 2024 : रंगपंचमीच्‍या जल्‍लोषावर CCTVची नजर

Rangpanchmi 2024 : होळीचा सण उत्‍साहात पार पडल्‍यानंतर आता नाशिककरांना रंगपंचमीचे वेध लागले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rangpanchmi 2024 : होळीचा सण उत्‍साहात पार पडल्‍यानंतर आता नाशिककरांना रंगपंचमीचे वेध लागले आहेत. यंदा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्‍साह बघायला मिळतो आहे. दरम्‍यान, शनिवारी (ता. ३०) रंगपंचमी उत्‍सवादरम्‍यान रहाड तसेच रेन डान्‍सचे आयोजन केलेल्‍या मंडळांनी आवारात सीसीटीव्‍ही बसवावेत. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी महिला व पुरुष स्‍वयंसेवकांची नियुक्‍ती करत त्‍यांना गणवेश व ओळखपत्र द्यावेत, अशा सूचना पोलिस यंत्रणेने दिल्‍या आहेत. (Nashik CCTV eyes on Rang Panchami celebration on 30 march marathi news)

लोकसभा निवडणुकांच्‍या पार्श्वभूमीवर रंगपंचमीचा आनंद द्विगुणित होणार आहे. यासंदर्भात पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी मंगळवारी (ता. २६) भद्रकाली पोलिस ठाणे येथे सार्वजनिक रंगपंचमी साजरा करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीस सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, नितीन जाधव, भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, पंचवटी पोलिस ठाण्याचे मधुकर कड, गंगापूर पोलिस ठाण्याच्‍या तृप्ती सोनवणे, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे सुरेश आव्हाड आदी उपस्थित होते. (latest marathi news)

बैठकीत मंडळांना विविध सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी केल्‍या. यामध्ये प्रामुख्याने वेळमर्यादेचे पालन करावे. ध्वनीमर्यादेचे पालन, गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्यास सांगितले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, स्वयंसेवकांची नियुक्‍ती करावी, अशा सूचनांचाही समावेश आहे. रंगोत्सवास येणाऱ्या नाशिककरांच्‍या वाहनतळाची व्‍यवस्‍था जुने नाशिक परिसरापासून बाहेर ठेवावी, अशी सूचनादेखील या वेळी मांडली. बैठकीस माजी महापौर विनायक पांडे, गणेश बर्वे, विशाल शेलार, सर्वेश पवार, अतुल जाधव, भूषण जुन्नरे, महेश महंकाळे, करण लोणारी, प्रशांत भालेराव, विकी लोणारी, अनुप गंभिरे, भीमा बागूल आदी उपस्‍थित होते.

पाच तास चालणार जल्‍लोष

शनिवारी (ता. ३०) दुपारी बारा ते सायंकाळी पाचदरम्‍यान रंगोत्‍सव साजरा करण्यास परवानगी दिलेली आहे. त्‍यामुळे पाच तास जल्‍लोष चालणार आहे. कुठल्‍याही रहाडीभोवती अचानक गर्दी होऊ नये, यादृष्टीने पोलिस यंत्रणेकडून नियोजन आखले जाते आहे. तसेच सुरक्षेच्‍या कारणास्‍तव चोख पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे, असे पोलिस उपायुक्‍त चव्‍हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT