CCTV on Police Recruitment
CCTV on Police Recruitment esakal
नाशिक

Nashik Police Recruitment: भरतीच्या चाचणीसाठी मैदानावर CCTVचा वॉच! ग्रामीणमध्ये 28 सीसीटीव्ही; शहरात 40 हॅण्ड कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Recruitment : नाशिक शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस दलातील रिक्त शिपाई पदांसाठीच्या जागांसाठी बुधवारपासून (ता.१९) मैदानी चाचणीला सुरूवात होते आहे. मैदानी चाचण्या पारदर्शक होण्यासाठी नाशिक ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानावर २८ सीसीटीव्ही कॅमेरे तर, नाशिक आयुक्तालयाकडून ४० हॅण्ड कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय पोलीस ताफाही ही प्रक्रिया राबविण्यासाठी सज्ज असणार आहे. (Nashik CCTV Watch on Ground for police Recruitment)

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअम येथे उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. आयुक्तालयाच्या ११८ रिक्त पदांसाठी ७ हजार ७१७ अर्ज आलेले आहेत. यानुसार, पहिल्या दिवशी (ता.१९) ५०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी सुसज्ज नियोजन करण्यात आले आहे.

मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया तर, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त असेल. मैदानावरील चाचणी पारदर्शक होण्यासाठी ४० हॅण्ड कॅमेर्यांच्या माध्यमातून रेकॉर्डिंग केली जाणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक उमेदवारांची नोंद केली जाणार आहे.

याचप्रमाणे, नाशिक ग्रामीणची मैदानी चाचणी मुख्यालयाच्याच मैदानावर होणार आहे. मैदानावरील उमेदवारांवर वॉच ठेवण्यासाठी २८ सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय, उमेदवारांच्या चाचण्यांची रेकॉर्डिंग हॅण्ड कॅमेऱ्याद्वारे केली जाणार आहे. सदरची भरती प्रक्रिया अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसला बंदी

मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी मोबाईल वा अन्य इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस मैदानावर आणू नये, अशी ताकिद पोलिसांकडूनच देण्यात आलेली आहे. असे आढळून आल्यास संबंधित उमेदवारांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. (latest marathi news)

वशिलेबाजीला थारा नाही

पोलीस भरतीची प्रक्रिया ही पारदर्शक होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना कोणाकडूनही वशिलेबाजी वा पैशांची मागणी करून भरती करून देण्याचे आमिष दाखविले जात असेल तर त्यांनी तत्काळ शहर व ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अन्यथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असेही आवाहन शहराचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

इकडेसिंथेटिक, तिकडे वॉटरप्रुफ

शहर आयुक्तालयाची भरतीप्रक्रिया मीनाताई ठाकरे स्टेडियमवरील सिंथेटिक ट्रॅकवर होणार आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतरही याठिकाणी मैदानी चाचणीला फारसा बाधा पोहोचण्याची शक्यता नाही. तर, नाशिक ग्रामीणची मैदानाची चाचणी आडगावच्या मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

पाऊस आल्यास १०० मी. धावण्याच्या चाचणीसाठी वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आलेला असून, १६०० मी. धावण्याची चाचणी ही डांबरी रस्त्यावर आहे. तरीही अतिपाऊस झाल्यास मैदानी चाचणीसाठी अतिरिक्त दिवसांचेही नियोजन दोन्हीकडे करण्यात आलेले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

SCROLL FOR NEXT