मालेगाव शहर : शहरातील चौकाचौकात होळीनिमित्त लाकडांचा वापर करून होळी पेटवण्यात आली. काही सामाजिक संस्थांनी अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा अशा बाबींचा नाश करत प्लॉस्टीक निर्मुलनासह, व्यसनी पदार्थ, गुटखा व कचऱ्याची होळी करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. (Nashik Celebrate Holi Festival in traditional way in Malegaon area marathi news)
राज्याच्या कानाकोपऱ्यात माळमाथा व काटवन भागातील ऊसतोडणी कामगार मजुरीसाठी जातात. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने ऊसतोडणीसाठी गेलेले मजूर होळीच्या पूर्वी घरी परतले. दुष्काळ असला तरी होळीचा आनंद द्विगुणित करता आला, अशी भावना मजुरांनी बोलून दाखवली.
ग्रामीण भागात पुरणपोळीचा नैवेद्य तर शहरी मंडळी पुरी- बासुंदी व श्रीखंड बेत करून नैवेद्य दाखवतात. होळीनिमित्त शहरातील महालक्ष्मी माहेश्वरी महिला मंडळातर्फे होळी गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. (latest marathi news)
संगमेश्वरात पारंपरिक होळीची परंपरा
संगमेश्वरात धुमधडाक्यात होळी सण साजरा केला जातो. येथील दोन चौकांना होळीचौक असे नामकरण झाले ते कायमचेच. जुना व नवा होळी चौक हे होळी सणाची साक्ष देतात. तलाठी कार्यालयामागील चौक हे संगमेश्वरातील जुने गाव.
या चौकात पारंपरिक पद्धतीने होळी करण्याची शतकाची परंपरा आहे. आता जुन्या होळी चौकात जयज्योती मंडळाचे कार्यकर्ते सक्रिय असतात. तर नवीन होळी चौकात त्रिशूळ मंडळाचे कार्यकर्ते होळीचा सण साजरा करून परंपरा जपत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.