Civil Services Examination  Google
नाशिक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी नाशिकला केंद्र

विनोद बेदरकर

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाने देशभरात चार नवीन परिक्षा केंद्रांना मान्यता दिली आहे. त्यात महाराष्ट्रातील नाशिक या एकमेव केंद्राचा समावेश आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परिक्षा केंद्र होते. उत्तर महाराष्ट्रात कोठेही परिक्षा केंद्र नसल्याने नाशिक, धुळे, जळगाव, नगर आणि नंदूरबार या पाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाची परिक्षा (UPSC) देण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांमध्ये जावे लागत असे. (Nashik center has been included for Union Public Service Commission examinations)

विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा वेळ आणि पैसाही वाया जात असे. खासदार गोडसे यांनी जुलै २०१७ मध्ये आयोगाचे सचिव राजेश कुमार सिन्हा यांना पत्र लिहून नाशिक येथे परिक्षा सेंटर व्हावे, यासाठी मागणी केली. आयोगाचे अध्यक्ष डेव्हिड यांची भेट घेवून नाशिक येथे आयोगाचे परिक्षा सेंटरचे महत्व पटवून दिले. डेव्हिड यांनी कोणत्याही शहरात आयोगाचे नवीन परिक्षा केंद्र सुरू करण्याचा विचार नसून नवीन केंद्र सुरू करतांना सर्वप्रथम नाशिकचा विचार केला जाईल असे लेखी पत्र दोन वर्षांपूर्वी खासदार गोडसे यांना दिले होते. अखेर आयोगाने एका परिपत्रकाद्वारे देशभरातील चार नवीन परिक्षा केंद्रांना मंजूरी दिली असून त्यामध्ये अलमोरा (उत्तराखंड), श्रीनगर (उत्तराखंड), नाशिक (महाराष्ट्र), सुरत (गुजरात) या परिक्षा केंद्रांचा समावेश आहे.


नाशिक हा पर्याय

आयोगाच्या या निर्णयामुळे ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या परिक्षा नाशिक येथील केंद्रावरच होणार आहे. यंदा होणाऱ्या योगाच्या सीएसपी परिक्षेसाठी मुंबई येथून १४, ८१९ , नागपूर येथून २२, ८४२, औरंगाबाद येथून १५, ३५५ , नवी मुंबई येथून ११, ८५५, पुणे येथून ३०, ३०० तर ठाणे येथून १०, ३५० विद्यार्थी परिक्षा देणार असून यापुढे या विद्यार्थ्यासाठी नाशिक सेंटर हा देखील पर्याय असणार आहे.


दरवर्षी उत्तर महाराष्ट्रातील सुमारे पंधरा हजार विद्यार्थी युपीएससीची परिक्षा देतात. आयोगाच्या निर्णयामुळे परिक्षार्थीना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील वर्षापासून आयोगातर्फे घेण्यात येणार्या एनडीए, सीडीएसची परिक्षाही नाशिक केंद्रावरूनच होतील.
- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

(Nashik center has been included for Union Public Service Commission examinations)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT