Union Undersecretary of Agriculture Manoj K who visited the market committee. esakal
नाशिक

Nashik Onion News : निर्यातशुल्क घटविण्यासाठी केंद्राला साकडे! केंद्रीय कृषी समितीची लासलगाव बाजार समितीला भेट

Nashik News : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीला भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीला भेट दिली. त्यावेळी समितीकडे कांद्याचे निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली, अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली. केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ३१) लासलगाव बाजार समितीला भेट दिली. (Nashik Onion News)

केंद्रीय अवर कृषी सचिव मनोज के., फलोत्पादन उपसंचालक पंकज कुमार, ग्राहक व्यवहार उपसंचालक मनोज कुमार, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसंचालक जगदीश पाटील आदी उपस्थित होते. कांदा उत्पादन खर्च, बाजारभाव, शिल्लक साठा, निर्यात धोरण, शेतकरी, व्यापारी वर्गाच्या अडचणी जाणून घेत केंद्रीय अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधी.

व्यापारी प्रतिनिधी व बाजार समितीच्या सदस्यांकडून माहिती घेतली. बैठकीत सरकारने निर्यात शुल्क शून्य करावे, वाढीव भाव रेशनिंग करून सरकार नियंत्रण करू शकते. तसेच, कायमस्वरूपी अभ्यासासाठी समिती स्थापना करावी, केंद्र, राज्य सरकार बाजार समिती घटकांची बैठक घेऊन नियोजनाची मागणी करण्यात आली.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे, सदस्य जयदत्त होळकर, संदीप दरेकर, बाळासाहेब दराडे, सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी प्रतिनिधी ओमप्रकाश राका, मनोज जैन, शेतकरी प्रतिनिधी गोकूळ पाटील उपस्थित होते. (latest marathi news)

कांदा प्रश्‍नावर चर्चा

जून व जुलैत वाढलेले आणि सध्या घटलेले भाव, नाफेड एजन्सी व एनसीसीएफच्या माध्यमातून केलेले स्टोअरेज जवळजवळ पूर्ण होत असताना इजिप्त, चीन, पाकिस्तानचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी भावात दाखल झाला. भारताची एमईपी ५५० डॉलर्स आणि ४० टक्के ड्युटीमुळे भारतीय कांद्याला मागणी नसल्याने भावात तफावत जाणवते.

दक्षिणेकडील आंध्रप्रदेश, कर्नाटकचा नवीन कांदा पुढील महिन्यात बाजारात येईल. जर पुढील महिन्यापासून सरकारचा बफर स्टॉक बाजारात आला तर भाव खाली येतील. उत्तरेकडील राज्यात श्रावण हा हिंदूंचा पवित्र महिना आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत मागणी कमी होऊन कांदादरात घसरण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

"कांदा हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. केंद्र सरकारने तत्काळ त्यावर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढून सततची निर्यात धोरण पॉलिसीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे." - बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, बाजार समिती, लासलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT