Central Railway esakal
नाशिक

Central Railway : मध्ये रेल्वे वाढविणार जनरलचे डबे!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मध्य रेल्वेतर्फे सामान्य श्रेणीतील प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, वेगवेगळ्या लांब पल्ल्याच्या ३८ रेल्वेगाड्यांमधील डब्यांची संख्या वाढविली जाणार आहे. नोव्हेंबर २०२४ पासून अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे या गाड्यांना जोडण्यात येतील. डब्यांची संख्या वाढणार म्हणून गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस येथे फलाटाची लांबी वाढविण्यात आली होती. (Central Railway)

सामान्य श्रेणीतील (जनरल बोगी) प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असून, अनेक जण सामान्य डब्यात जागा न मिळाल्याने थेट आरक्षित डब्यात प्रवेश करतात. अनेकदा विनातिकीटही प्रवास करतात. याला आळा घालून प्रवाशांना सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. डब्यांची संख्या वाढल्यावर सर्वसाधारण प्रवाशांना याचा लाभ होईल.

भुसावळ विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त सामान्य श्रेणी डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या गाड्या अशा ः १२१०५/१२१०६ मुंबई- गोंदिया- विदर्भ, ११०५७/११०५८ मुंबई- अमृतसर- मुंबई, २२१८३/२२१८४ लोकमान्य टिळक टर्मिनस- अयोध्या, ११०७१/११०७२ लोकमान्य टिळक टर्मिनस- बलिया.

११०६१/११०६२ लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर, २२१०९/२२११० लोकमान्य टिळक टर्मिनस- बल्लारशाह, ११०५९/११०६० लोकमान्य टिळक टर्मिनस- छपरा, ११०५५/११०५६ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, १२१६७/१२१६८ लोकमान्य टिळक टर्मिनस- बनारस, १२१४१/१२१४२ लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र, १२१०१/१२१०२ लोकमान्य टिळक टर्मिनस- शालिमार. (latest marathi news)

१२१५१/१२१५२ लोकमान्य टिळक टर्मिनस- हावडा, १२१४५/१२१४६ लोकमान्य टिळक टर्मिनस- पुरी एक्स्प्रेस, ११०७९/११०८० लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्स्प्रेस, २२१२९/२२१३० लोकमान्य टिळक टर्मिनस- अयोध्या, ११०८१/११०८२ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर, २२१०३/२२१०४ लोकमान्य टिळक टर्मिनस- अयोध्या एक्स्प्रेस, १२१४३/१२१४४ लोकमान्य टिळक टर्मिनस- सुलतानपूर एक्स्प्रेस.

१२१६५/१२१६६ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्स्प्रेस, २०१०३/२०१०४ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्स्प्रेस, १२१०७/१२१०८ लोकमान्य टिळक टर्मिनस- सीतापूर टर्मिनस, १२१७३/१२१७४ लोकमान्य टिळक टर्मिनस- प्रतापगड एक्स्प्रेस, १२१६१/१२१६२ लोकमान्य टिळक टर्मिनस- आग्रा कॅट एक्स्प्रेस, १२१५३/१२१५४ लोकमान्य टिळक टर्मिनस- राणी कमलापती एक्स्प्रेस, १२१४९/१२१५० पुणे- दानापूर- पुणे एक्स्प्रेस.

१२१११/१२११२ मुंबई- अमरावती एक्स्प्रेस, १२१३९/१२१४० मुंबई- नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, २२१५१/२२१५२ पुणे- काजीपेठ- पुणे एक्स्प्रेस, १२१०३/१२१०४ पुणे- लखनौ एक्स्प्रेस, ११४२७/११४२८ पुणे- जसडीह एक्स्प्रेस, ११४०७/११४०८ पुणे- लखनौ एक्स्प्रेस, १२८१०/१२८०९ हावडा- मुंबई मेल, १२८७०/१२८६९ हावडा- मुंबई एक्स्प्रेस, १२८१२/१२८११ हतिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १२८३४/१२८३३ हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस, १२८६०/१२८५९ हावडा- मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, १८६०९/१८६१० रांची- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, २२८४६/२२८४५ हतिया- पुणे एक्स्प्रेस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT