Nashik Crime News esakal
नाशिक

Forest smuggler : पथकाला लागेना वनतस्करांचा ठावठिकाणा; संशयितांना पकडण्याचे वनविभागापुढे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वनविभागामार्फेत तीन महिन्यात तस्करांविरोधात करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईनंतर त्यातील सूत्रधारांचा साथीदार पकडण्यात अद्यापही वनविभागाच्या पथकाला यश आलेले नाही. या संशयिताचा कुठलाच ठाव ठिकाणा मिळत नसल्याने हे संशयित पकडण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे आहे. एप्रिलमध्ये वनविभागाच्या पथकाने नांदगाव तालुक्यातील अस्वलदरा येथे कारवाई करत इंद्रजाल आणि घोरपडीचे लिंग मोठ्या प्रमाणात जप्त केला होते.

यात वनविभागाने या तस्करीचा सूत्रधार खत्री यास अटक केली होती. या अटकेनंतर वनकोठडीत असलेल्या संशयित याने चौकशीमध्ये त्याच्या सोबत आणखी दोन साथीदार असल्याचे सांगितले. या कारवाईला तीन महिने उलटूनही हे दोन संशयित वनविभागाच्या हाती लागलेली नाही.

त्याप्रमाणे २१ जूनला महाराष्ट्र, गुजरातच्या सीमेवर खैरची तस्करी करणारा नवसू लोहार ऊर्फ पुष्पा हा वनविभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली होती. नवसू लोहार हा खैर तस्करीमधील सर्वात मोठा सूत्रधार होता. त्याच्या अटकेमुळे खैर तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस येणार होते. नवसू याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याने २५ संशयिताचे नाव घेतले होते. त्यापैकी १५ जण हे गुजरातमधील निघाले.

तसेच नवसू ज्यांना खैर विकत होता. त्या ‘शेठ’ चा देखील पत्ता वनविभागाला लागला. मात्र अटकेपूर्वीच तो पसार झाला. वन विभागाचे पथक तीन दिवस गुजरातमध्ये तळ ठोकून होते तरीही एकही संशयित सापडला नाही. यानंतर खैर वन गुन्हे प्रकरणात महाराष्ट्रातील सीमेलगत असलेले गावातील नऊ संशयित आरोपी आहेत. (latest marathi news)

या सर्व आरोपींना सीआरपीसी अंतर्गत कलम ४१(अ) नोटीस बजावण्यात आली.त्यांना हजर राहण्याची आदेश देण्यात आले. मात्र एक संशयित वगळता कोणीही चौकशीसाठी हजर झाले नाही. मागील तीन महिन्यात वनविभागाने दोन मोठ्या कारवाई करत वनतस्कर यांच्यावर वचक बसविला. मात्र यातील सर्व संशयित पकडण्यात विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे वनविभागाच्या तपास यंत्रणेवरच संशय व्यक्त केला जावू लागला आहे.

"मध्यवर्ती सीमेवरील खैर तस्कर कारवाईप्रकरणी तपास योग्य दिशेने सुरू आहे. संशयित भूमिगत झालेले आहेत. या कारवाईच्या निमित्ताने तस्करीशी संबंधित गुन्हेगारांवर वचक निर्माण झालेला आहे. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. लवकरच संशयितांना अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल." - डॉ. सुजित नेवसे, विभागीय व्यवस्थापक, वनविकास महामंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT