Nashik News : गेल्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यावेळी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केल्याची चर्चा रंगली होती. मात्र अवघ्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पोलिसांच्या हाती लागत असल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (challenges of investigating fake notes before police)
निवडणुकीत तर बनावट नोटांचा वापर झाला नसावा अशी शंका उपस्थित केली जात असून, त्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू असल्याचे समजते. अंबड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बनावट नोटांविरोधात कारवाई करीत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या ३० बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
तर याच दरम्यान शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने नाशिक रोड मुक्तिधाम परिसरातून दोन महिलांना अटक करत त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या महिला गृहिणी असल्याचे पोलिस तपासातून समोर आले असले तरी या नोटा त्यांच्याकडे आल्या कशा, याचा पोलिस तपास करीत आहेत. (latest marathi news)
दरम्यान, नुकत्याच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. यात मोट्या प्रमाणात पैशाचा वापर केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. ‘हजार रुपये फुली’ दिल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे, त्यातीलच तर या नोटा बाहेर आल्या की काय, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. अचानक बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याने अशा चर्चांना उधाण आले आहे.
तसेच यातील काही नोटा चलनात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. या दृष्टिकोनातून ही शहर पोलिसांनी तपास सुरू केल्याचे समजते. मात्र या बनावट नोटांच्या मागे नेमका सूत्रधार कोण, पोलिस त्याच्यापर्यंत पोचतील का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या तत्कालीन एका पदाधिकाऱ्यास बनावट नोटांसह अटक करण्यात आली होती. त्या वेळीही अशीच चर्चा रंगली होती. सध्या बनावट नोटा आढळून येऊ लागल्याने पुन्हा चर्चांना सुरवात झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.