चांदोरी : निफाड तालुक्यातील महत्वपूर्ण गाव असलेल्या तसेच, नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्गावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता असूनही कित्येक वर्षांपासून कामगिरी सरस आहे. या ठिकाणी एकूण मंजूर पदे २४ असून, १२ भरलेली पदे आहेत. एकूण १२ पदे रिक्त आहेत. (Chandori Primary Health Center performed 115 family planning surgeries)
असे असतानाही वाढत्या लोकसंख्येला मर्यादित ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन शस्रक्रिया प्रभावी मार्ग असून, त्यासाठी लाभार्थ्यांना आशासेविका व उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून एप्रिल व मे या दोन महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक ११५ कुटुंब नियोजन शस्रक्रिया डॉ. योगेश धनवटे यांनी यशस्वी पार पाडल्या. तर ३८ प्रसूती सुखरूप पार पडल्या.
गेली कित्येक वर्ष या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असून, यासंदर्भात कित्येकदा पाठपुरावा करून देखील येथील रिक्त कर्मचाऱ्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १५ गावे असून, चांदोरी १, चांदोरी २, चाटोरी, चितेगाव, खेरवाडी, सायखेडा या ठिकाणी आरोग्य उपकेंद्रे असून, त्या माध्यमातून ६० हजाराहुन अधिक नागरिकांना आरोग्याच्या सेवा सुविधा पुरवल्या जात आहेत.
दररोज साधारण शेकडो रुग्ण प्राथमिक उपचारासाठी येत असतात. तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देत आहेत. मात्र, केंद्रांतर्गत असणाऱ्या गावात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर आरोग्य सेवेचा भार येत आहे. वारंवार रिक्त पदांची पूर्तता व्हावी, यासाठी मागणी केली जात आहे. (latest marathi news)
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संगीत खुर्चीचा खेळ
काही वर्षांपूर्वी डॉ. मुकुंद सवई निवृत्त झाल्यानंतर ग्रामीण भागातील मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी लाभलेले नाही. तीन ते चार महिने सेवा केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी बदलत असल्याने सह्यांचे नमुने बदलत असेपर्यंत नवीन अधिकारी नियुक्त होतात. पूर्णवेळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी लाभल्यास चांदोरीसह आरोग्य केंद्रांतर्गत गावांना अनुभवाचा फायदा होऊ शकतो, अशी नागरिकांची भावना आहे.
"गेल्या तीन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला असून, सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न असेल. कुठल्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही, यासाठी नेहमी लक्ष दिले जाईल." - डॉ. सायली जोगदंड, वैद्यकीय अधिकारी, चांदोरी
अशी आहे स्थिती
आरोग्य केंद्रांतर्गत गावे :१५
लोकसंख्या : ६० हजार १८२
आरोग्य उपकेंद्र : ६
पदनाम--- (कंसात मंजूर पदे) रिक्त पदे
वैद्यकीय अधिकारी : (२) १
आरोग्य सहाय्यक : (२) १
आरोग्य सहायिका : (१) १
आरोग्य सेविका : (६) ४
आरोग्य सेविका (ओपीडी) : (२) २
परिचर : (४) २
कनिष्ठ सहाय्यक : (१) १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.