Commissioner Ravindra Jadhav, officers present in front, employees while guiding the meeting of Sanitation and Malaria Department in Municipal Hall  esakal
नाशिक

Nashik NMC News : वेळेत बदल, कामात हलगर्जी नको! महापालिका आयुक्तांचा स्वच्छता कर्मचाऱ्यांना तंबी

Nashik News : शहर व परिसरातील वाढत्या तापमानामुळे स्वच्छता विभागातील कामगारांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहर व परिसरातील वाढत्या तापमानामुळे स्वच्छता विभागातील कामगारांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कामगारांनी वेळेत आवश्यकतेनुसार सकाळी ५ ते दुपारी १२ असा बदल करावा. या वेळेतच काम पूर्ण करून घ्यावे. यामुळे उष्णतेचा त्रास जाणवणार नाही.

सकाळी गटार साफ केल्यानंतर सायंकाळी पाचनंतरच कचरा उचलावा अशा सूचना देतानाच स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त रवींद्र जाधव यांनी गुरुवारी (ता. १८) मनपा सभागृहात झालेल्या बैठकीत दिला. (Nashik Change in time dont slack off in work NMC Commissioner news)

महानगरपालिकेच्या स्वच्छता व मलेरिया विभागाकडील मुकादम, स्वच्छता निरीक्षक यांची बैठक मनपा सभागृहात श्री. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. श्री. जाधव म्हणाले, शहरात दैनंदिन स्वच्छतेबाबतच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २२ एप्रिलपासून विशेष स्वच्छता मोहीम राबवून गटार साफ करावी.

गटारीतील कचरा उन्हाच्या वेळी न उचलता सायंकाळी पाचनंतर कचरा उचलावा. झाडू कामगारांनी देखील सकाळच्या सत्रात कामकाज पूर्ण करावे. दुसऱ्या दिवसाचे कामाचे नियोजन आदल्या दिवशीच करावे. कोणत्याही परिस्थितीत स्वच्छतेबाबत तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी. गटारावरील अतिक्रमण तातडीने काढावे. स्वच्छतेच्या कामात अतिक्रमण अडथळा ठरणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी.

मलेरिया विभागाने औषध फवारणी, धुरळणी या कामासाठी सकाळ, संध्याकाळच्या सत्रात नियोजन करावे. डास प्रतिबंधक उपाययोजना करावी. कामकाजात कोणत्याही कामगार, मुकादम, स्वच्छता निरीक्षक यांनी बेजबाबदार वर्तन व हयगय केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करू. कामगारांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी.  (latest marathi news)

शहरात कुठेही कचरा जाळला जाणार नाही, झाडू कर्मचारी गटारात कचरा टाकणार नाही याची दक्षता संबंधित वॉर्ड मुकादम व स्वच्छता निरीक्षकांनी घ्यावी. जेसीबी वाहन, कचरा वाहतूक करणारे वाहने, मक्तेदाराची वाहने, कामगारांना आवश्यक असणारी साहित्य आदींबाबत स्वच्छता विभागप्रमुख सहाय्यक आयुक्त अनिल पारखे यांना कार्यवाही करून पुर्तता करण्याचे आदेश देण्यात आले.

२२ एप्रिलपासून सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभाग कार्यक्षेत्रात ‘विशेष स्वच्छता मोहिमेचा’ शुभारंभ करून सुक्ष्म पद्धतीने निरीक्षण ठेवून आपला प्रभाग स्वच्छ करून घ्यावा. सहाय्यक आयुक्त, उपायुक्तांनी अचानक भेट देऊन पाहणी करावी असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीस उपायुक्त गणेश शिंदे, श्री. पारखे, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, सचिन भामरे, मोहम्मद इरफान, प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, एकबाल जान मोहम्मद आदींसह स्वच्छता व मलेरिया विभागाचे स्वच्छता निरीक्षक, मुकादम, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT