Nashik Bakri Eid Traffic Route Change : सोमवारी (ता. १७) बकरी ईद असून यानिमित्ताने सामुहिक नमाज पठण करण्यासाठी त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानाम मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. (nashik Change in traffic route due to Bakri Eid)
मुस्लिम बांधवांचा ‘बकरी ईद’ हा सण सोवारी (ता. १७) साजरा होतो आहे. यानिमित्ताने त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर शहरातील शेकडो मुस्लिम बांधव सामुहिक नमाज पठण करण्यासाठी येतात. यामुळे त्र्यंबकरोडवर मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडीचीही समस्या उद्भवू शकते.
या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये व वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात येऊन पर्यायी मार्गांचा वापर करण्याबाबतची अधिसूचना वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केले आहेत. सदरची वाहतूक मार्गातील बदल हे सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहतील. तसेच, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका यांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत. (latest marathi news)
हे मार्ग असतील बंद
* त्र्यंबक पोलीस चौकी ते मायको सर्कल पर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असेल.
* गडकरी चौक ते मोडक सिग्नलपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असेल.
हे आहेत पर्यायी मार्ग
* त्र्यंबक पोलीस चौकीकडून उजवीकडे वळून ठाकरे गल्ली, शालिमार, मेनरोड मार्गे मार्गस्थ
* चांडक सर्कल, संदीप हॉटेल, मुंबई नाका मार्गे मार्गस्थ
बॅरिकेटींग पॉईंट
सारडा सर्कल, गडकरी चौक, चांडक सर्कल, सेंट फ्रान्सिस हायस्कल टी पाईंट, जलतरळ तलाव सिग्नल, मोडक सिग्नल, अण्णाभाऊ साठे पुतळा, खडकाळी सिग्नल, सीबीएस सिग्नल, मेळा स्टॅण्ड, टिळकवाडी सिग्नल, मेळा स्टॅण्ड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.