Nashik Traffic Route Change  esakal
नाशिक

Nashik Traffic Route Change : मुंबई नाका, भगूर येथे यात्रोत्सव; नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता.३) प्रारंभ होत आहे. शहराची ग्रामदेवता कालिका देवी यात्रोत्सव तर, भगूर येथे रेणुका देवी यात्रोत्सव असल्याने या परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. हे बदल दसऱ्यापर्यंत (ता.१२) राहतील. बदल संदर्भात व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याची अधिसूचना पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे. (Changes in traffic routes in view of Navratri festival in city )

कालिका देवी बॅरकेडिंग पॉइंट

त्र्यंबक नाका सिग्नल, गडकरी सिग्नल, मुंबई नाका टॅक्सी स्टँड, चांडक सर्कल, महापालिका आयुक्त बंगला, शिंगाडा तलाव, संदीप हॉटेल.

प्रवेश बंद

- गडकरी सिग्नल ते मुंबई नाका टॅक्सी स्टँड

- चांडक सर्कल ते हॉटेल संदीपपर्यंत

पर्यायी मार्ग

- तिडके कॉलनीतून नंदिनी नदी पुलावरून गोविंदनगर मार्गे इंदिरानगर, मुंबई नाका, सिटी सेंटर मॉलकडे मार्गस्थ

- चांडक सर्कल, सीबीएस, शालीमार, सारडा सर्कलकडे मार्गस्थ - द्वारकाकडून येणारी वाहने सारडा सर्कल, शालीमारमार्गे येतील-जातील

- प्रवासी वाहने, सिटी लिंक बसेस त्र्यंबक नाका सिग्नलवरुन गंजमाळ, सारडा सर्कलमार्गे नाशिकरोडकडे मार्गस्थ

- हलकी वाहने मुंबई नाक्यावरून टॅक्सी स्टँडमार्गे तुपसाखरे लॉन्स, चांडक सर्कल, त्र्यंबक रोडमार्गे मार्गस्थ (latest marathi news)

- द्वारका सिग्नलकडून पंचवटीत जाणारी अवजड वाहने कन्नमवारपूल, संतोष टी पॉइंट, रासबिहारी हायस्कूलमार्गे मार्गस्थ

- सारडा सर्कल, गडकरी चौकात येणारी वाहने एन. डी. पटेल रोड मार्गे जि.प. रस्त्यावरून मार्गस्थ

रेणुका देवी भगूर प्रवेश बंद

रेस्ट कॅम्परोड हा चिंतामणी चौफुली ते नाका क्रमांक दोनपर्यंत

पर्यायी मार्ग

भगूर गावातून देवळाली कॅम्पकडे येणारी जाणारी वाहने रेस्ट कॅम्प रस्त्यावरील जोशी रुग्णालय-स्नेहनगर-पेरुमल मार्ग-टेम्पल हिल रोड-जोझिला मार्ग-रेस्ट कॅम्प रस्त्यावरील सेंट्रल स्कूलमार्गे मार्गस्थ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींची प. महाराष्ट्रात राजकीय मशागत; सांगलीनंतर एकाच महिन्यात कोल्हापूर दौरा, नेमकं काय घडणार?

'सारं काही तिच्यासाठी' फेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म; मुलगा की मुलगी?

Assembly Elections 2024 : तुमचं बर हाय, आमची फरपट कवा थांबणार? भोकर मतदारसंघात भावी आमदारांची गर्दी, मूलभूत गरजांची वाणवा

Navratri Recipe : नवरात्रीचा उपवास! सोप्या पद्धतीने घरी बनवा पौष्टिक उपवासाची खांडवी

Elon Musk: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आर्थिक संकटात; इलॉन मस्कला मोठे नुकसान, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT