Chhagan Bhujbal and suhas kande  esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : ‘त्या’ बदल्या रद्द करा; छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Bhujbal: डावलून केलेल्या बदल्यांची चौकशी करून बदल्या रद्द करण्याची मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : महापालिकेतील सेवाज्येष्ठता डावलून केलेल्या बदल्यांची चौकशी करून बदल्या रद्द करण्याची मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना एकूण तीन पत्रे मंत्री भुजबळ यांनी पाठवली आहेत. (nashik chhagan bhujbal Demand for canceling transfers marathi news)

नगररचना कार्यकारी अभियंतापदी करण्यात आलेल्या नियुक्तीत अर्थकारणाच्या तक्रारी आहेत. एका महिन्यात दोन मोठ्या पदांची जबाबदारी एका अधिकाऱ्याला देण्यात आली.कनिष्ठ अभियंत्याकडे नियमबाह्यपणे नगररचना तसेच बांधकाम विभाग उपअभियंता पदाचा पदभार दिला आहे.

आचारसंहितेपूर्वी होत असलेल्या बदल्यांबाबत तक्रारी आहेत. या बदल्यांची चौकशी करून त्या रद्द करण्याची मागणी मंत्री भुजबळ यांनी केली आहे. शहरात सध्या सुरु असलेली भूसंपादनाची प्रक्रिया तसेच मिसिंग लिंक भूसंपादन थांबवण्याचेही पत्र भुजबळ यांनी पाठवले आहे. (Latest Marathi News)

भुजबळ-कांदे वादाचा पुढचा अंक?

नाशिक शहरातील गंगापूर रोडवर भागातील चोपडा हॉस्पिटललगत सर्व्हे क्रमांक ७१७ या भूखंडावर शैक्षणिक आरक्षण आहे. या आरक्षित भूखंडावरील मूळ आरक्षणाबाबत हरकती मागवण्यात आल्या आहेत. मूळ शैक्षणिक आरक्षण हटवून त्यावर रहिवासी आरक्षण निश्चित केले जात आहे.

या संदर्भात नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी आरक्षण हटविण्याबाबत पत्र दिले होते. मात्र आता हे आरक्षण हटवू नये, यासाठी मंत्री भुजबळ पुढे आल्याने नांदगावातील वादाचा पुढचा अंक नाशिकमध्ये पाहायला मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही जागा दहा वर्षांसाठी महापालिकेच्या ताब्यात असणार आहे.

त्या आधीच शैक्षणिक झोन रद्द करणे चुकीचे असल्याचे मंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यात महानगरपालिकेचे नुकसान होणार आहे. मात्र काही लोकप्रतिनिधींच्या शिफारशींनी हे होत असल्यावर भुजबळ यांनी बोट ठेवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT