Chhagan Bhujbal esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : भुजबळ यांनी भरली जिल्हा बॅंकेची साडेसहा कोटींची थकबाकी; उमेदवारी करण्याचे संकेत

Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीत नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजित पवार गट) गेल्याचे निश्चित झाले असून, राष्ट्रवादीकडून अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे.

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीत नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजित पवार गट) गेल्याचे निश्चित झाले असून, राष्ट्रवादीकडून अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. यातच उमेदवारीला कर्ज थकबाकीचा अडथळा येऊ नये यासाठी भुजबळ यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या थकबाकीचा भरणा केला आहे. जिल्हा बॅंकेच्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेचा भुजबळ यांनी लाभ घेत, ३१ मार्चला तब्बल साडेसहा कोटींची थकबाकी भरली आहे. (nashik Chhagan Bhujbal paid arrears of district bank marathi news)

उर्वरित २८ कोटी नऊ महिन्यात हप्त्याव्दारे भरण्याची त्यांनी हमी दिली आहे. ही थकबाकी भरून भुजबळ यांनी उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेली जिल्हा बॅंक थकीत कर्ज वसुलीसाठी ॲक्शन मोडवर आली आहे. भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या साखर कारखान्याकडील कोट्यवधींची थकबाकी आहे.

या वसुलीसाठी जिल्हा बँकेने भुजबळ कुटुंबीयांना जानेवारी महिन्यात नोटीस दिली होती. बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कारखाना स्थळावर जाऊन मागणी नोटीस चिकटवली होती. त्याचप्रमाणे कारखान्याचे संचालक असलेल्या समीर व पंकज या भुजबळ बंधूना देखील नोटीस दिली होती. या नोटीशीला प्रतिसाद मिळाला नसल्याने ३१ मार्चच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बॅंकेने वसुलीसाठी कडक पावले उचलत कारखाना मालमत्ता लिलावाची देखील जाहीरात काढली होती.

मात्र, या थकबाकीकडे त्यांनी गांभार्याने लक्ष दिले नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांची उमेदवारी निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. उमेदवारी करतांना कोठेही थकबाकी नसावी, याशिवाय जिल्हा बॅंकेला अडचणी आणण्यावरून भुजबळांनीच अनेकदा इतरांवर टिका केली आहे. (latest marathi news)

त्यामुळे जिल्हा बॅंकेची थकबाकी भुजबळांनाही अंगलट येऊ नये यासाठी, त्यांनी जिल्हा बॅंकेची थकबाकी भरण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलले. बॅंकेची थकबाकी भरण्यासाठी बड्या थकबाकीदारांसाठी जिल्हा बॅंकेने सुरू केलेल्या नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजनेचा त्यांनी लाभ घेतला. यात त्यांनी एकूण थकबाकीच्या योजनेत बसविले.

यात भुजबळ यांनी ६.५० कोटींच्या थकबाकीचा भरणा केला. तसेच उर्वरित थकबाकी असलेल्या २८ कोटींची हप्ते करून घेतले. हे हप्ते भरण्यासाठी त्यांना नऊ महिन्यांची मुदत आहे. उमेदवारीच्या निमित्ताने का होईना भुजबळ यांनी थकबाकी भरली. यातून जिल्हा बॅंकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

सामोपचार कर्ज परतफेड योजनेला मुदतवाढ

जिल्हा बॅंकेने थकबाकीदारांच्या विशेषतः मोठ्या थकबाकीच्या वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना नोव्हेंबर महिन्यात आणली होती. या योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. परंतू, योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बॅंक प्रशासनाने योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेने योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता ३० जूनपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT