Bhujbal  esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : मुख्यमंत्र्यांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास : भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : खासदार शरद पवार यांचा राजकारण व समाजकारणाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याने आरक्षणाच्या वादात मध्यस्ती केली तर हा प्रश्न लवकर सुटू शकतो, ए‌वढाच माझा बोलण्याचा अर्थ होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बद्दल मी काहीच बोललेलो नाही. मुख्यमंत्र्यांबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला. (Chhagan Bhujbal statement of Paraphrase of statement about Chief Minister )

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीमध्ये पक्षाच्या जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर श्री. भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार यांच्यामध्ये आरक्षणावरून तुलना केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना आरक्षणाबाबत काही कळत नाही, असा संदेश गेल्याने शिंदे सेनेत नाराजी पसरली होती. (latest marathi news)

यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांबद्दल मी काही बोललो नाही. शरद पवार यांचे समाजकारण व राजकारणातील अनुभव जास्त आहे, एवढेच मी म्हटले. मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलाविलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते आले नाही, त्यामुळे हा प्रश्न सुटणार कसा? असा सवाल उपस्थित करत हा राजकीय नव्हे तर सामाजिक प्रश्न आहे.

त्यासाठी सर्वजण एकत्र येणे गरजेचे आहे. त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचेही हेच मत आहे. त्यामुळेच मी शरद पवार यांची भेट घेतल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. काही लोकांना महाराष्ट्र पेटलेला बघायचा आहे. मराठा व ओबीसी आरक्षणाचा विषय हा संवेदनशील आहे, असे भुजबळ म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT