Chhagan Bhujbal : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा मी तरी ऐकलेली नाही. पण पक्षाचा आदेश असेल तर लोकसभा निवडणूक लढवेन, असे वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी इगतपुरीत केले. समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते नांदगाव सदो या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यानंतर भुजबळ सोमवारी (ता. ४) माध्यमांशी बोलत होते. (nashik Chhagan Bhujbal statement marathi news)
‘लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. आमच्या पक्षातर्फे उद्या आणि परवा असे दोन दिवस अनेक जिल्ह्यांतील प्रमुख लोक एकत्र भेटून कुणाची शक्ती कुठे अधिक आहे, याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर जागावाटपाचे निश्चित होईल,’ असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. (latest marathi news)
नाशिकची जागा कुणाला सुटणार व कोण उमेदवार असणार, याबाबत अद्याप व्यवस्थित चर्चा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत आम्ही दहा जागांची मागणी केली आहे. तूर्तास आमच्यासमोर तुतारी, हात, मशाल असे कोणत्याच चिन्हाचे आव्हान दिसत नसल्याचे भुजबळ म्हणाले. लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा नाही; पण पक्षाने आदेश दिल्यास लढावेच लागेल, असेही मंत्री भुजबळ म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.