Dilapidated condition of roads in Niphad taluka esakal
नाशिक

Nashik Road Damage : नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्ग खड्ड्यात; बुजवलेल्या खड्ड्यांनी पुन्हा तोंड काढले

माणिक देसाई : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्राच्या कॅलिफोर्नियातील रस्त्यांचे रिमझिम पावसात पितळ उघडे पडले आहे. बुजवलेले खड्डे पुन्हा तोंड वर काढत असल्यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहे. तर निफाड तालुक्यातील इतर भागांतील रस्त्यांची देखील दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar road pitted Burdened pits resurfaced)

तालुक्यात काही नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून, सध्या पावसाळा असल्याने ही कामे संथ गतीने चालू आहे. निफाड हा बागायती तालुका आहे. लासलगाव, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा, भाजीपाला, धान्य लिलावासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या, रानवड कारखाना व तालुक्याबाहेर इतर कारखान्यांना उस वाहतूक करणारी वाहने.

निफाड, ओझर, पिंपळगाव बसवंत, लासलगाव, विंचूर, सायखेडा, पालखेड, कसबे सुकेणे, चांदोरी या मोठ्या लोकसंख्येच्या गावांतून खरेदी- विक्रीसाठी होणारी वाहतूक, द्राक्ष वाहतूक करणारी वाहने, कंटेनरची वर्दळ मोठ्या स्वरूपात असते. तालुक्यात चारचाकी, दुचाकी वाहनांची संख्या जास्त आहे. मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्ग.

निफाड-चांदवड रस्ता, निफाडहुन सिन्नरला जोडणारे रस्ते, सुरत-शिर्डी रस्ता असल्याचे वाहनांची गर्दी असते. पावसाला नुकतीच सुरुवात झाली असली तरी तालुक्यातील काही भागांतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर काही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केल्याने या रस्त्यांचा काही भाग उखडला गेला. (latest marathi news)

रुईफाटा ते खेडलेझुंगे रस्ता, रुई (धानोरे) ते डोंगरगाव, बोकडदरे येथील म्हसोबा माथा ते धारणगाव वीर, गंगापूर पाट ते निसाका काटा गेट, धारणगाव (वीर) ते सारोळे थडी, विंचूर ते डोंगरगाव मार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे.

गोदाकाठ पट्ट्यातही हाल

कोठुरे ते करंजगाव या रस्त्याचे डांबरीकरण झाले असले तरी या मार्गावरील मोऱ्यांवर प्रचंड खड्डे आहेत. त्यामुळे वाहने हळू चालवावी लागतात. मोऱ्यावरील रस्ता दुरुस्तीची मागणी केली जात आहे. कोळगाव ते देवगाव या ७ ते ८ किलोमीटर रस्त्याच्या निम्म्या रस्त्याला प्रचंड खड्डे पडले आहेत. मांजरगाव ते करंजगाव, भेंडाळी ते करंजगाव या व इतर काही ग्रामीण भागातील गावांच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारक वैतागले आहेत.

बिबट्याच्या हल्ल्याची भीती

बिबट्या आणि निफाड तालुका हे समीकरण तयार झाले आहे. निफाड तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली असून, ग्रामीण भागात खड्ड्यांच्या रस्त्यावरून सायंकाळी, रात्री वाहने चालवताना बिबट्याचा भीतीने जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. करंजगाव ते भेंडाळी या रस्त्यावर मागीलवर्षी दुचाकीवर बिबट्याने हल्ले केल्याच्या २ ते ३ घटना घडल्या होत्या. नाशिक-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर पिंपळस (रामाचे) ते बोकडदरे यादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.

"नाशिक-छत्रपती संभाजी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. परंतु, या खड्ड्यांबाबत आवाज उठवला की तेवढ्यापुरता खड्डे बुजवण्याचा सोपस्कार केला जातो. मात्र, ती खड्डे पुन्हा वर डोके काढतात. संबंधित विभाग दखल घेत नसेल तर आम्हाला या आंदोलनाचा विचार करावा लागेल." - राजेंद्र बोरगुडे, संचालक, लासलगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती

"नाशिक-छत्रपती संभाजी नगर महामार्ग सध्या अतिशय खडतर बनला आहे. विंचूर ते पिंपळस हा रस्ता तर वाहनधारकांना अतिशय अडचणीचा ठरत आहे. हलक्या पावसातही प्रचंड खड्डे पडल्याने त्याचा प्रवासी वाहतूकदारांना त्रास होत आहे. प्रशासनाने दखल घेऊन या महामार्गाचे काम करावे. अन्यथा, शिवसेना स्टाईलने आंदोलन करु." - विक्रम रंधवे, युवा जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT