Nashik News : तालुक्यातील कळवाडी, सोनज व निमगाव जिल्हा परिषद गटातील गावांसाठी चणकापूर व गिरणा धरणातून वाढीव पाणी आरक्षित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने संबंधित जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. आमदार सुहास कांदे यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. (Chief Minister approves increased water reservation in kelawadi Sonai and Nimgaon groups)
सदर कामासंदर्भात तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिल्याने या भागातील हजारो एकर शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन नांदगाव मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मालेगाव तालुक्यातील कळवाडी.
सोनज व निमगाव जिल्हा परिषद गटातील गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचे साकडे घातले होते. पाण्याअभावी या भागातील नागरीकांना स्थलांतर करावे लागत आहे. पाळीव जनावरे जगवणे अशक्यप्राय होत आहे. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या दृष्टीने चणकापूर व गिरणा धरणातून वाढीव पाणी आरक्षित केल्यास पिण्याच्या व शेती सिंचनाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा आग्रह धरला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना या मागणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश दिले. उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे सहाय्यक मुख्य अभियंता संग्रामसिंह रावल यांनी छत्रपती संभाजीनगरच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना वरील गावांसाठी चणकापूर धरणातील पाणी आरक्षित करावे. (latest marathi news)
तसेच, उपसा सिंचन योजना टेंबू व म्हैसाळच्या धर्तीवर मंजूर करण्यासंदर्भात बैठक घेऊन सदर योजनेस हिरवा कंदील दिला आहे. नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता प्र. रा. लोधे यांनी सदर योजनेसंदर्भात वरीलप्रमाणे नाशिक जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र देऊन सदर प्रस्तावास मान्यता दिल्याचे कळविले आहे.
दरम्यान, याच बैठकीत टाकळी, मांजरे ते नगाव कालवा दुरुस्तीसाठी सुमारे ४२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. सदर कामाची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने तीनही जिल्हा परिषद गटातील नागरीकांनी आमदार कांदे यांचे आभार मानले आहे.
या मागण्यांचा समावेश
चणकापूर धरणातून गिरणा उजवा कालव्यासाठी (वाढीव) पाणी आरक्षित करावे. मांजरे, नगावपर्यंत बंदिस्त पाईपलाईन मंजूर करावी. कालव्याची रामेश्वर ते झाडीदरम्यान वहन क्षमता वाढवावी. माळमाथ्यावरील गिगांव, दहिवाळ, रोझे, पाडळदे, शेरूळ, हिसवाळ या गावांसाठी गिरणा धरणातून पाणी आरक्षित करुन लिफ्ट करणे व गिरणा पांझण डावा कालवा कळवाडीसह सात गावांसाठी पाणी आरक्षित करावे, आदी मागण्या आमदार कांदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.