CM Eknath Shinde  esakal
नाशिक

CM Eknath Shinde : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

CM Eknath Shinde : वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे. अनेक दिवस ते कल्याणकारी मंडळाची मागणी करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

CM Eknath Shinde : वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे. अनेक दिवस ते कल्याणकारी मंडळाची मागणी करीत आहेत. त्याचीही घोषणा लवकरच करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी यासंदर्भात मागणी केली होती. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र हा महत्त्वाचा घटक आहे. कामाची पद्धत, कामाची वेळ, अत्यल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे, अशी मागणी आहे. (Minister Eknath Shinde Announces on Welfare Board for Newspaper Vendors)

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, बालाजी पवार (नांदेड), विकास सूर्यवंशी (सांगली), राजेंद्र टिकार (बुलढाणा), रवींद्र कुलकर्णी (मालेगाव), महेश कुलथे (नाशिक), पापा यादव, अशोक नागमोती, संजय जगताप, वाल्मीक पगारे यांनी याबाबत वेळोवेळी शासनाकडे मागणी करीत पाठपुरावा सुरू ठेवला. कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ, संभाजी पाटील-निलंगेकर, दिलीप वळसे-पाटील व विद्यमान कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला.

संभाजी पाटील-निलंगेकर कामगारमंत्री असताना त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाबाबत अभ्यास समिती नेमली. या समितीने आपला अहवालही सादर केला. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे, अशी शिफारस केली आहे. मात्र, त्यानंतर चार वर्षे झाली तरी अंमलबजावणी होताना दिसत नाही.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीचा आमदार केळकर यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. श्री. केळकर यांनी सध्या सुरू असणाऱ्या अधिवेशनातही स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे, अशी मागणी केली. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र केले आहे, या घटकालाही न्याय द्यावा, असा आग्रह व्यक्त केला. (latest marathi news)

मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत बोलताना आमदार केळकर यांच्या मागणीबाबत सांगितले, की वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे. ते कल्याणकारी मंडळाची मागणी अनेक वर्षांपासून करीत आहेत. आमदार केळकर हेही चार वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही न्याय देऊ, त्यांच्या कल्याणकारी मंडळाचीही घोषणा करू, असे आश्‍वासन दिले.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून गेली १५ वर्षे पाठपुरावा करीत आहोत. आमदार संजय केळकर यांनी या वेळी ही मागणी मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच घोषणा करण्याचे आश्‍वासन दिले. ही आनंदाची व सकारात्मक बाब आहे. आमदार केळकर यांच्या माध्यमातून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.

लवकरात लवकर मंडळाची घोषणा व्हावी व अंमलबजावणी सुरू व्हावी, अशी मागणी करणार आहोत, अशी माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोशाध्यक्ष राजेंद्र टिकार, रवींद्र कुलकर्णी, महेश कुलथे व ठाणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT