Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी सकाळी नाशिकमध्ये रोड शो होत आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी (ता. १६) पुन्हा नाशिकला येत आहेत. (Chief Minister Eknath shinde road show on Gangapur Road today)
गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो होणार आहे. सकाळी दहाल रोड शोला अशोक स्तंभ येथून प्रारंभ होऊन गंगापूर रोडने जेहान सर्कल, एबीबी सर्कलमार्गे ठक्कर डोम येथे रोड शोचा समारोप होईल.
या रोड शोसाठी शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वात कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. (latest marathi news)
यात सुमारे ३०० पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तसेच साध्या वेशातील पोलिसही या रोड शोमध्ये असतील. यानंतर, ठक्कर डोम येथे शिवसेनेचा महिला मेळावा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.