Chief Minister Eknath Shinde while speaking at a meeting of the district educational institute directors and teachers held in Nashik on Saturday. Guardian Minister Dada Bhuse, Kishor Darade, esakal
नाशिक

Nashik CM Shinde Daura : शिक्षक आणि संस्थाचालकांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Nashik News : नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर महासंघ आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दराडे यांना दिलेल्या पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिक्षकांची जुनी पेन्शन योजना आणि संस्थाचालकांच्या शिक्षकेतर अनुदान संबंधित प्रश्नांसह इतर सर्व समस्यांबाबत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉटेल एक्स्प्रेस इन येथे दिले. (Chief Minister Eknath Shinde statement Govt positive regarding questions of teachers and administrators)

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी आयोजित केलेल्या जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, श्रीकांत देशपांडे, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार पांडुरंग गांगड, बाळासाहेब सानप आदी व्यासपीठावर होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना आहे तशी देणे, २०११ च्या धोरणानुसार शाळांना अनुदानाचे टप्पे देणे, शिक्षण संस्थांना शिक्षकेतर आणि वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार देणे, आश्रमशाळांची वेळ पूर्वीप्रमाणे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच करणे यासह शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक आहे. त्या दृष्टीनेच विचार करून या प्रश्नांवर मार्ग काढला जाईल.

कंत्राटी पद्धतीवर भरण्यात आलेले शिक्षक, वेतनातील फरक बिले, आरोग्य बिले आदी प्रश्न सरकारने मोठा निधी देत यशस्वीरीत्या हाताळले आहेत. शिक्षक समाजाचा कणा आहे. प्रत्येकाचे आयुष्य ते घडवितात. त्यामुळे त्यांच्या संबंधित प्रश्नांबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे आणि भविष्यातही राहील. भविष्यातही शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सर्व प्रश्नांचा अभ्यास असणाऱ्या दराडे यांना पुन्हा निवडून दिले पाहिजे. (latest marathi news)

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक विभाग शिक्षक लोकशाही आघाडी, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना, जागृत शिक्षक-शिक्षकेतर संघटना, महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ (नाशिक), शिक्षण संघर्ष संघटना, आयटीआय कर्मचारी संघटना.

नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर महासंघ आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दराडे यांना दिलेल्या पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तत्पूर्वी, उमेदवार किशोर दराडे यांनी प्रास्ताविकात आपल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. या वेळी पक्षाचे उपनेते भाऊसाहेब चौधरी, भाजप नेते विजय साने.

लक्ष्मण सावजी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, विजय करंजकर, रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश लोंढे, हेमंत धात्रक आदींसह जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मोहन चकोर आणि एस. बी. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT