Chief Minister Eknath Shinde was speaking at the inauguration ceremony of Balasaheb Thackeray Memorial Park esakal
नाशिक

Nashik CM Shinde Daura : बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानातून युवकांना प्रेरणा, ऊर्जा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

Nashik CM Shinde Daura : शहराला मुलभूत सोयीसुविधा असायला पाहिजे. मात्र त्याचवेळी सामान्यांच्या विरुंगुळ्यासाठी सुसज्ज असे उद्यानही हवे. उद्यानात येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा मिळेल, युवकांना ऊर्जा मिळेल असे हे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान असून, यासाठी सरकार काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिककरांना भरघोष निधीसह सिडको फ्री होल्ड करण्याचे आणि महापालिकेच्या घरपट्टीबाबत लवकरच ‘गुड न्युज’ देण्याचेही आश्वासन दिले. त्याचवेळी ‘लाडकी बहीण योजने’वरून विरोधकांवर टीकाही केली.  (CM Shinde Balasaheb Thackeray Memorial Park lokarpan)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्यानाच्या कोनशिलेचे लोकार्पण करण्यात आले.

गंगापूर रोड परिसरातील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, सिडकोचे अध्यक्ष व आमदार संजय शिरसाठ, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, माजी मंत्री बबनराव घोलप, विजय करंजकर आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे विविध पैलू उलगडणारे हे स्मृती उद्यान आहे. उद्यानातील साहसी खेळ, कलादालन, सॉफ्टस्कील प्रशिक्षण, वाचनालय, इ-वाचनालय हे नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरणारे असून, जागतिक दर्जाचे हे उद्यान असणार आहे. शहराचा विकास म्हणजे पायाभूत सुविधा, रस्ते, इमारती असा होत नाही तर सर्वसामावेश विकास करीत असताना सर्वसामान्यांना विरुंगुळा वाटावा, उद्यान म्हणजे ऑक्सिजन सेंटर असावे, असेही ते म्हणाले. 

प्रारंभी शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविक करताना साडेसात एकरात वसलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्यानाच्या कोनशिलेचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर कलादालनाला भेट देत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांची पाहणी करताना त्यांना जुन्या आठवणींचा उजाळाही दिला. साहसी पार्कच्या कामाचेही पाहणी केली. अजय बोरस्ते यांनी दत्तक घेतलेल्या मुलींच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांचे औक्षण करण्यात आले. 

सीएम म्हणजे कॉमन मॅन

सर्वसामान्य माणसाला काय हवे याचा विचार करणारा मुख्यमंत्री हवा असतो. सीएम म्हणजे कॉमन मॅन असे मानणारा मी मुख्यमंत्री असून सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांना भेटणारा मी मुख्यमंत्री असून, बाळासाहेब नेहमी सांगायचे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून मुख्यमंत्र्याने लोकांना भेटण्यासाठी खाली यावे. अन्‌, पूर्वीचे तर घरात बसून,सुरक्षेच्या गराड्यात राहणारे मुख्यमंत्री होते अशा शब्दात उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली. (latest marathi news)

मुख्यमंत्री शिंदेंनी कलादालनाला भेट देत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांची पाहणी करताना त्यांना जुन्या आठवणींचा उजाळाही दिला

सावत्र भावांपासून सावधान

लाडकी बहीण  योजनेमुळे अनेकांना पोटदुखी झाली आहे. अशा सावत्र भावांपासून माझ्या लाडक्या बहिणींनी सावध रहावे. दीड हजारांची किंमत सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना काय कळणार. त्यामुळे योजना बंदसाठी कोर्टात धाव घेतली पण कोर्टाने त्यांचा तोंडावर पाडले. योजना बंद होणार नाही, तर दीड हजारांची रक्कम वाढत जाईल. लाडक्या बहिणी लखपती झालेल्या पहायच्या असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. 

निधी अन्‌ आश्वासने

बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात व्हर्च्युअल ऑडिओ युनिट उभारले जाणार आहे. यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विचारवंतांचे आधुनिक पद्धतीने विचार ऐकता येणार आहे. त्यासाठी १० कोटींचा निधी आणि भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी ४० कोटी मंजूर केले असून, १५ कोटी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तसेच, शहरातील सिडको फ्री होल्ड करण्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रीमंडळासमोर आणण्याची सूचना सिडकोचे अध्यक्ष व आमदार संजय शिरसाठ यांना केली. त्याचप्रमाणे, महापालिकेच्या घरपट्टीसंदर्भात लवकरच आनंदाची बातमी देऊ असेही आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 

राज्य देशात प्रथमच

विरोधकांकडून सतत महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणांवर टीका केली जाते. परंतु आजघडीला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवरच नव्हे तर अव्वलस्थानावर आहे. सर्वाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये पहिला क्रमांक आपला लागतो. यापूर्वी तर घरात बसून पहिला क्रमांक कसा मिळाला असेल असे म्हणत टीकाही केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Metro Inauguration: नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो आणि राज्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : कापसाच्या व्यापाऱ्याला साडेबारा कोटींचा गंडा,मुंबईच्या दोघांवर संभाजीनगरात गुन्हा

Mehmood : ट्रेनमध्ये अंडी विकणारे मेहमूद नंतर बॉलिवूडमध्ये झाले कॉमेडी किंग ; दिग्गज अभिनेत्यांनाही वाटायची भीती

Pro Kabaddi 11:'...तर डुबकी किंग आहेस हे विसरून जा', परदीप नरवालला बंगळुरूचे कोच रणधीर यांचा मोलाचा सल्ला

Latest Maharashtra News Live Updates: नागपूर विमानतळावर नितेश राणेंविरोधात शिवसैनिकांचे घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT